Digital India : केंद्र सरकार प्रत्येक नागरिकासाठी राष्ट्रीय डिजिटल प्रोफाईल तयार करत आहे. यामुळे तुम्हाला आता कोणत्याही सरकारी प्रकिया किंवा योजनेचा लाभ घेताना प्रत्येक वेळी फॉर्म भरावा अथवा कागदपत्रे दाखवावी लागणार नाहीत. तुम्हाला प्रत्येक वेळी आयडी, पासवर्ड, पॅन, बँक खाते, टीआयएन, टॅन, जीएसटीएन, आरटीओ, विमा क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज नाही. यासाठी सरकार सर्व सरकारी सेवांसाठी पोर्टल आणि अ‍ॅप आणणार आहे. या पोर्टलचे नाव 'सिंगल साईन ऑन' (Single Sign On Service) असेल. नॅशनल सिंगल साईन-ऑन पोर्टलवर सर्व सरकारी सेवा केंद्र आणि राज्य सेवांमध्ये एकत्रित केल्या जातील.


ही नागरिकांच्या पडताळणीची अशी प्रक्रिया आहे, ज्यात एकाच आयडीद्वारे सर्व प्रकारच्या सरकारी सेवांचा लाभ घेता येतो. म्हणजे आता वारंवार पडताळणीच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही. यानंतर वेगवेगळ्या सेवा आणि योजनांना जोडण्यासाठी लॉगिन आयडी-पासवर्ड लक्षात ठेवण्याची गरजच उरणार नाही. म्हणजे तुम्ही एखादा सुविधेसाठी अर्ज करू इच्छित असाल तर फॉर्म उघडताच त्या सेवेच्या फॉर्ममध्ये तुमची पूर्ण माहिती आपोआप भरली जाईल. या पोर्टलवर एकदा साईन इन करावे लागेल. नंतर युजर ऑथेंटिकेशन होईल. त्यानंतर जीवनभर या एकाच आयडीद्वारे कोणत्याही योजनेचा लाभ घेतला जाऊ शकेल.


सिंगल साइन ऑन पोर्टलवरून शाळा, महाविद्यालयातील प्रवेश, शैक्षणिक प्रमाणपत्रे, वीज, पाणी बिले जमा करणे, रेल्वे आणि विमान तिकीट घेणे, घरपट्टी भरणे, आयकर परतावा, जीएसटी रिटर्न दाखल करणे, व्यवसायाला परवानगीशी संबंधित सुविधा मिळतील. शिष्यवृत्ती अर्ज, व्यवसाय मान्यता, स्टार्टअप नोंदणी करण्याची सुविधाही याच प्लॅटफॉर्मवर मिळू शकेल. व्यवसायाशी संबंधित काही सेवाही याच पोर्टल किंवा अॅपद्वारे वार्षिक अपडेशनसाठी वर्षातून एकदा ओके बटण टिक करून पुश्ती करावी लागेल. बँकिंग सेवांसाठी वापरल्या जाणारी केवायसीही यात जोडली जाईल. सरकार डिजिलॉकरही या सुविधेसोबत जोडेल, जेणेकरून अर्जासह आवश्यक कागदपत्रेही येथे उपलब्ध होतील.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha