Subhash Chandra Bose : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 23 जानेवारी रोजी त्यांची जयंती आहे. नेताजींनी स्वातंत्र्य चळवळीत मोलाचा वाटा निभावला. त्याच्या स्मरणार्थ कृतज्ञता म्हणून हा दिवस दरवर्षी 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा केला जातो. या वर्षी 2022 मध्ये सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी केली जात आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी कटक, ओडिशा, बंगाल विभागात झाला. बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती होते. सुभाषचंद्र बोस यांचे वडील जानकीनाथ बोस हे व्यवसायाने वकील होते आणि त्यांची आई गृहिणी होत्या. 


नेताजी यांचे प्राथमिक शिक्षण कटक येथील रेवेनशॉ कॉलेजिएट स्कूलमध्ये झाले. यानंतर त्यांचे पुढील शिक्षण कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेज आणि स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये झाले. यानंतर त्यांच्या पालकांनी बोस यांना भारतीय नागरी सेवेची तयारी करण्यासाठी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठात पाठवले. नेताजींनी 1920 मध्ये इंग्लंडमध्ये नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली परंतु भारतीय स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित चळवळींमध्ये सहभागी होते. 





 


सुभाषचंद्र बोस यांच्यावर लहानपणापासूनच स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण यांच्या शिकवणुकीचा प्रभाव होता. भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी, 'तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूँगा' यांसारख्या घोषणांनी देशातील कोट्यवधी क्रांतिकारकांच्या हृदयाचे ठोके बनलेले नेताजी सुभाषचंद्र बोस लहानपणापासूनच राष्ट्रवादी कार्यात सहभागी होते. ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांची एकदा महाविद्यालयातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र पुढेही त्याने आपला मार्ग बदलला नाही.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha