Coronavirus Cases Today in India : देशात आज कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये किंचित वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 1096 नवीन रुग्ण आढळले असून 81 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1260 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 83 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 13,013 वर
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरात देशात 1 हजार 447 रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 13 झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 21 हजार 345 झाली आहे. देशात आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 93 हजार 773 लोक संसर्गमुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत 4 कोटी 30 लाख 28 हजार 131 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
आतापर्यंत 184 कोटींहून अधिक डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे 184 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. शनिवारी दिवसभरात 12 लाख 75 हजार 495 डोस देण्यात आले. आतापर्यंत कोरोना लसीचे 184 कोटी 66 लाख 86 हजार 260 डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 2 कोटींहून अधिक (2 कोटी 34 लाख 18 हजार 617) कोरोना लस देण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Adani : अदानींनी मुकेश अंबानी आणि झुकेरबर्गला मागे टाकलं, जगातील टॉप 10 श्रीमंतांमध्ये सामील, जाणून घ्या किती आहे संपत्ती
- YouTuber भुवन बामच्या व्हिडीओवरून नवा वाद; महिलांचा अपमान केल्याचा आरोप, राष्ट्रीय महिला आयोगाची कठोर कारवाईची मागणी
- मानवांची नग्न छायाचित्रे अंतराळात पाठवणार, एलियन्सना आकर्षित करण्यासाठी शास्त्रज्ञांची कल्पना
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha