एक्स्प्लोर

Corona India Update | देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत सर्वाधिक 8,909 ने वाढ, एकूण रुग्णसंख्या 2 लाखांवर

कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. भारतात देखील याचा प्रादुर्भाव वाढतोय. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 2 लाख 7 हजार वर गेला आहे. दिलासादायक बाब म्हणजे भारतात एक लाख एक हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.देशातील कुठल्या राज्यात कोरोनाची काय स्थिती आहे? जाणून घ्या...

मुंबई : देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. मागील 24 तासात 8 हजार 909 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. ही वाढ कोरोनाबाधितांची आतापर्यंतची 24 तासातली सर्वाधित वाढ आहे. तर गेल्या 24 तासात 217 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 लाख 7  हजार 615 झाली आहे. त्यापैकी 5 हजार 815 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 303 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात 4 हजार 776 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. देशाचा रिकव्हरी रेट 48.31 टक्के आहे. सध्या देशात कोरोनाची लागण असलेले म्हणजेच अॅक्टिव्ह रुग्ण 1 लाख 1 हजार 497 आहेत.

देशभरात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहेत.राज्यात सध्या कोरोनाबाधितांचा आकडा 72300 झाला आहे. त्यातील 31333 बरे झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 2465 जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात काल 1225 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 31 हजार 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचं प्रमाण राज्यात वाढताना दिसतंय. दरम्यान, काल कोरोनाचे 2287 नवे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात 38 हजार 493 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप सात राज्य 

तामिळनाडू 24586 रुग्ण, 13706 बरे झाले, मृतांचा आकडा 197

दिल्ली  22132 रुग्ण, 9243 बरे झाले, मृतांचा आकडा 556

गुजरात  17617 रुग्ण, 11894 बरे झाले,  मृतांचा आकडा 1092

राजस्थान  9373  रुग्ण, 6435 बरे झाले, मृतांचा आकडा 203

मध्यप्रदेश 8420 रुग्ण, 5221 बरे झाले, मृतांचा आकडा 364

उत्तरप्रदेश 8361 रुग्ण, 5030 बरे झाले, मृतांचा आकडा 222

पश्चिम बंगाल 6168 रुग्ण, 2410 बरे झाले , मृतांचा आकडा 335

जगभरात कोरोनाचे जवळपास 65 लाख रुग्ण  कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात पाहायला मिळत आहे. जगभरातील 213 देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 1 लाख 10 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मृतांचा आकडा 4528ने वाढला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत जवळपास 65 लाख लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 3 लाख 81 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 30 लाख लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 75 टक्के कोरोनाग्रस्त फक्त 13 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 48 लाखांवर पोहोचली आहे. जगभरात कुठे किती रुग्ण, किती मृत्यू? कोरोनाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव अमेरिकेमध्ये दिसून येत आहे. अमेरिकेमध्ये 19 लाख लोक आतापर्यंत कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. एक लाखांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. परंतु, सध्या अमेरिकेपेक्षा ब्राझीलमध्ये अमेरिकेपेक्षा जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. ब्राझीलमध्ये संसर्ग वेगाने वाढत आहे. ब्राझीलनंतर रूस आणि भारतातील कोरोना बाधितांची संख्या जगभरात वेगाने वाढत आहे. अमेरिका : एकूण रुग्ण 1,881,205, एकूण मृत्यू 108,059 ब्राझील : एकूण रुग्ण 556,668, एकूण मृत्यू 31,278 रूस : एकूण रुग्ण 423,741, एकूण मृत्यू 5,037 स्पेन : एकूण रुग्ण 287,012, एकूण मृत्यू 27,127 यूके : एकूण रुग्ण 277,985, एकूण मृत्यू 39,369 इटली : एकूण रुग्ण 233,515, एकूण मृत्यू 33,530 भारत : एकूण रुग्ण 207,191, एकूण मृत्यू 5,829 फ्रान्स : एकूण रुग्ण 189,220, एकूण मृत्यू 28,940 जर्मनी : एकूण रुग्ण 184,091, एकूण मृत्यू 8,674 पेरू : एकूण रुग्ण 170,039, एकूण मृत्यू 4,634
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhika Yadav : राधिका यादवला आयुष्याचा आनंद घ्यायचा होता,विदेशात जायचं होतं, प्रशिक्षकासोबत व्हाट्सअपवरील संभाषण समोर 
इथं खूप बंधनं, विदेशात जायचंय, राधिका यादवच्या प्रशिक्षकासोबतच्या संभाषणातून नवी माहिती समोर
Girls Hostel : जळगावच्या महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण, 7 दिवसांनी घटना उघड, वॉर्डनवर ठपका
जळगावच्या महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण, 7 दिवसांनी घटना उघड, वॉर्डनवर ठपका
राजगुरुनगरमध्ये मैत्रीचा विश्वासघात! मैत्रिणीनेच चोरले लाखोचे दागिने, व्हॉट्सअॅपमुळे फुटले बिंग!
मैत्रिणीकडूनच दागिन्यांची चोरी, व्हाट्सअॅप स्टेट्सने भांडाफोड; विश्वासघातकी मैत्रीची चोरटी कथा
Chirag Paswan : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जिवे मारण्याची धमकी, 20 जुलैचा उल्लेख अन् इन्स्टाग्रामवर पोस्ट 
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जिवे मारण्याची धमकी, 20 जुलैचा उल्लेख अन् इन्स्टाग्रामवर पोस्ट 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Shinde Delhi Daura: शिंदेंच्या दिल्लीवारीचं कारण काय?दिल्लीत जाऊन शिंदेंनी गायलं गाऱ्हाणं?
Special Report EXTORTION CASE : MLA Abhijit Patil यांना ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक, पंढरपूरमध्ये सापळा
Special Report Eknath Shinde Delhi Visit : दिल्लीवारीने राजकारण तापले, सुप्रीम कोर्ट सुनावणी चर्चेत
Special Report : आमदार संजय गायकवाडांवर Non-Cognizable Offense, विरोधकांचा सवाल, पश्चाताप नाही!
Yashwant Raje Holkar Yojana:योजनेच्या निधीसाठी अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते;संस्थाचालकाचा गंभीरआरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhika Yadav : राधिका यादवला आयुष्याचा आनंद घ्यायचा होता,विदेशात जायचं होतं, प्रशिक्षकासोबत व्हाट्सअपवरील संभाषण समोर 
इथं खूप बंधनं, विदेशात जायचंय, राधिका यादवच्या प्रशिक्षकासोबतच्या संभाषणातून नवी माहिती समोर
Girls Hostel : जळगावच्या महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण, 7 दिवसांनी घटना उघड, वॉर्डनवर ठपका
जळगावच्या महिला वसतिगृहात गतिमंद मुलीला मारहाण, 7 दिवसांनी घटना उघड, वॉर्डनवर ठपका
राजगुरुनगरमध्ये मैत्रीचा विश्वासघात! मैत्रिणीनेच चोरले लाखोचे दागिने, व्हॉट्सअॅपमुळे फुटले बिंग!
मैत्रिणीकडूनच दागिन्यांची चोरी, व्हाट्सअॅप स्टेट्सने भांडाफोड; विश्वासघातकी मैत्रीची चोरटी कथा
Chirag Paswan : केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जिवे मारण्याची धमकी, 20 जुलैचा उल्लेख अन् इन्स्टाग्रामवर पोस्ट 
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांना जिवे मारण्याची धमकी, 20 जुलैचा उल्लेख अन् इन्स्टाग्रामवर पोस्ट 
पिंपरी-चिंचवडचे नामकरण जिजाऊ नगर करा, भाजपच्या महिला आमदाराची मागणी, मुख्यमंत्र्यांना दिलं निवेदन 
पिंपरी-चिंचवडचे नामकरण जिजाऊ नगर करा, भाजपच्या महिला आमदाराची मागणी, मुख्यमंत्र्यांना दिलं निवेदन 
Sanjay Raut on Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
मुख्यमंत्र्यांची दया येते, स्वतःच्या अब्रूचे आणखी किती धिंडवडे फक्त पाहत बसणार? हतबलतेचं दुसरं नाव फडणवीस! संजय राऊतांचा घणाघात
ABP Majha Impact : धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
धनगर विद्यार्थी शाळा भ्रष्टाचार, दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई
Donald Trump : रशिया कनेक्शनमुळं अमेरिका भारतावर 500 टक्के टॅरिफ लादणार? अमेरिकन खासदाराचं मोठं वक्तव्य
रशियाकडून तेल खरेदी केल्यानं अमेरिका भारतावर 500 टक्के टॅरिफ लादणार? अमेरिकेतील दोन्ही पक्ष एकत्र आले
Embed widget