Corona Guidelines : चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Coronavirus) सातत्याने वाढ होत आहे. चीनसोबतच जगातील अनेक देशांमध्ये या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक देशांनी निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकारने (India) सुद्धा यावर मात करण्याची तयारी सुरू केली असून, राज्य सरकारकडून देखील बैठका बोलावण्यात येत आहेत. अलीकडेच, कोरोनाचा धोका लक्षात घेता, केंद्र सरकारकडून एक अॅडव्हायझरी जारी करण्यात आली. तसेच नागरिकांना कोविड परिस्थितीत 'एप्रोप्रिएट बिहेविअर' (Appropriate Behaviour) म्हणजेच योग्य वागणूकीचा सल्ला देत आहे. ज्यामध्ये मास्क घालण्याचा आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला. सध्या देशात कोरोनाबाबत काय नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत? ते जाणून घेऊया.


कोरोनाचे रुग्ण कमी असताना निर्बंध उठवले
जसे की आपण पाहिले, भारतात कोरोनाने पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कहर केला, यात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अचानक रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडली होती. मात्र, त्यानंतर हळूहळू परिस्थिती सुधारली आणि रुग्णसंख्येत सातत्याने घट होत गेली. रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोरोनावरील निर्बंधही शिथिल होऊ लागले. अखेर 1 एप्रिल 2022 पासून सर्व प्रकारचे निर्बंध हटवण्यात आले. आता पुन्हा एकदा कोरोनाचा धोका वाढला आहे, अशा परिस्थितीत केंद्र सरकार नागरिकांना कोविड परिस्थितीत एप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजेच योग्य वागणूकीचा सल्ला देत आहे. कोरोनाबाबत काय खबरदारी आहे? जाणून घ्या


कोविड काळातील 'एप्रोप्रिएट बिहेविअर' म्हणजे काय?


-जर तुम्ही एखाद्याला भेटलात तर त्याला हस्तांदोलन किंवा मिठी न घेता शारीरिक स्पर्शाशिवाय नमस्कार करा, यासाठी तुम्ही हात जोडून अभिवादन करू शकता.


-कोरोनाला सामोरे जाण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी दोन व्यक्तींमध्ये अंतर करावे असे सांगण्यात आले. जेणेकरून कोरोनाचा प्रसार रोखता येईल.


-सरकारने लोकांना फेस मास्क पुन्हा वापरता येण्याचा सल्ला दिला आहे. विशेषत: गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचे आवाहन केले आहे.


-जर तुम्ही बाहेर असाल तर तुमच्या डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला हात लावणे टाळा. यासाठी तुम्ही आधी हँड सॅनिटायझर वापरू शकता. सतत हात धुत राहा.


-कोरोनाला रोखण्यासाठी उघड्यावर थुंकणे टाळावे, असा सल्लाही सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना पसरण्याचा धोका कायम आहे.


-कोरोनाला रोखण्यासाठी अत्यंत आवश्यक असतानाच प्रवास करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, म्हणजेच गर्दीपासून दूर राहा, असेही सांगण्यात आले आहे.


-सोशल मीडियावर अशी कोणतीही पोस्ट टाकू नका, ज्यामुळे नकारात्मक माहिती किंवा भीती पसरण्याचा धोका असेल. जर तुम्हाला कोरोनाबद्दल कोणतीही माहिती मिळवायची असेल, तर त्यासाठी विश्वासार्ह स्त्रोतचा वापर करा.


-सर्व गोष्टी कोविड 'एप्रोप्रिएट बिहेविअर'च्या अंतर्गत येतात, जे भारताच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोनाबाबत जारी केले होते. ज्याचे पालन करण्यासाठी अॅडव्हायजरी जारी करण्यात आली आहे. 



-मात्र, सर्व तज्ज्ञ आणि सरकारचे म्हणणे आहे की, भारतात सध्या कोरोनाबाबत घाबरण्याची गरज नाही