National Gokul Mission Scheme : दुग्ध व्यवसायाच्या (Dairy Business) संदर्भात लवकरच केंद्र सरकार (Central Government) मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत (National Gokul Mission Scheme) 50 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना (Farmers) दुग्ध व्यवसाय करण्यासाठी 50 टक्के अनुदान उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन देशातील तरुण शेतकरी स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतील, अशी माहिती केंद्रीय मत्स्यव्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. संजीव बल्यान (Minister Sanjeev Balyan) यांनी दिली.


50 लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याचं उद्दीष्ट


कोरोनाच्या महामारीपासून (Corona Crisis) कृषी आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात नवीन स्टार्टअप्स (startups) सुरु झाली. तसेच या माध्यमातून नवीन व्यवसाय सुरु झाल्याचे दिसू लागलं. आता सरकारनं नवीन व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्याची तयारी केली आहे. दुग्ध व्यवसायाला चालना देणाऱ्या राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेअंतर्गत (National Gokul Mission Scheme) सरकार गाय, म्हैस, कोंबडी, शेळी आणि डुक्कर पालनाचा व्यवसाय करण्यासाठी सरकारकडून 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्रात 50 लाखांहून अधिक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार देण्याचा सरकार प्रयत्न असल्याचे मत डॉ. संजीव बालियान यांनी सांगितले.


राष्ट्रीय गोकुळ मिशनचा थेट लाभ मिळणार 


राष्ट्रीय गोकुळ मिशन योजनेंतर्गत देशी गायींच्या संगोपनाला चालना दिली जात आहे. या योजनेंतर्गत, सरकारने आता प्राण्यांच्या उपचारासाठी 4 हजार 332 हून अधिक पशुवैद्यकीय युनिट (Veterinary Unit) उघडण्याची व्यवस्था केली आहे. तरुण, शेतकरी किंवा कोणताही व्यावसायिक आता मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन याबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. सध्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढत आहे. त्यामुळं या व्यवसायूतन मोठ्या प्रमाणावर नफा मिळवणं शक्य आहे. त्यामुळं या व्यवसायातून अधिकाधिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अनेक योजनांवर काम करत आहे. शेतकऱ्यांना पशुपालन किंवा दुग्ध व्यवसायासाठी आता 50 टक्के अनुदानही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळं सरकारच्या या योजनेचा लाभ घेऊन देशातील तरुण स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकतील.


महत्त्वाच्या बातम्या:


Cattle Feed Price : दूध उत्पादनाचा खर्च वाढला, पशूखाद्याच्या किंमतीनं मागील 9 वर्षांचा विक्रम मोडला, पशुपालक चिंतेत