Corona Vaccine Update: 'कोविशिल्ड' लस देशात 13 ठिकाणी पोहोचली, जगातील सर्वात मोठ्या लसीकरणासाठी भारत सज्ज
कोरोना विषाणूला समूळ नष्ट करण्यासाठी लसीकरणाला लवकरचं सुरुवात करण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून भारतात सुरू होणार आहे.
नवी दिल्ली : कोरोना महामारीचा नाश करण्यासाठी कोरोना लस रवाना झाली आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून भारतात सुरू होणार आहे. औपचारिक प्रारंभ आजपासून (मंगळवार) होणार आहे. कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकण्यासाठी भारताला आज कोविशिल्डची लस मिळाली आहे. अशा परिस्थितीत कोविशिल्ड लसीची पहिली तुकडी विविध राज्यात पाठवण्यात येत आहे.
लसीचे वितरण दिल्लीसह अनेक राज्यात पोहोचले आहे. या लसीच्या वितरणासाठी एअर इंडियाची मदत घेण्यात येत आहे. लसीची पहिली डिलीव्हरी एअर इंडियाच्या विमानातून सुमारे 13 ठिकाणी पाठवण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशचा समावेश आहे.
कोविशिल्ड लस दिल्लीत पोहचली कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आज कोविशिल्ड लसीची पहिली डिलीव्हरी दिल्लीत पाठवण्यात आली आहे. स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना लसीची पहिली खेप दिल्लीत दाखल झाली आहे. पहिल्या बॅचमध्ये 34 बॉक्स आहेत, ज्यांचे एकूण वजन 1088 किलो आहे. लवकरच दिल्लीत लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे.
Corona Vaccine | सरकारकडून कोरोना लसींंच्या 6 कोटी डोसची ऑर्डर
गुजरातमध्येही लस दाखल मिळालेल्या माहितीनुसार कोरोना लशीची पहिली खेप गुजरातच्या अहमदाबाद येथे पोहोचली आहे. 16 जानेवारीपासून राज्यातील एकूण 287 केंद्रांवर लसीकरणार सुरुवात होणार आहे. राज्य सरकारने लस लवकरात लवकर विविध ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाची लस आज लखनौला पोहचणार कोवशील्ड लसची पहिली खेप आज यूपीची राजधानी लखनऊमध्ये दिली पोहचणार आहे. प्राप्त माहितीनुसार कोरोना लसची पहिली तुकडी सायंकाळी चार वाजता लखनौला पोहचणार आहे. लस साठवण्यासाठी दहा लाख रुपये खर्चून एक स्टोअर रूमही तयार करण्यात आला आहे.
लसीची पहिली तुकडी तमिळनाडूमध्येही दाखल कोरोना लसीची पहिली तुकडी तामिळनाडूला पोहोचली आहे. तामिळनाडूत कोरोना लसीचे 5.56 लाख डोस पोहचले आहेत. लवकरात लवकर वेगवेगळ्या भागात लस लावण्याची मोहीम सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.