एक्स्प्लोर

Corona vaccination: मार्चमध्ये 50 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची घोषणा

भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून आतापर्यंत 50 लाखांहून जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. मार्च महिन्यापासून 50 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलंय.

नवी दिल्ली: भारतात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता सामान्य नागरिकांना कोरोनाची लस मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून मार्च महिन्यापासून 50 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केलीय.

भारतात 16 जानेवारीपासून कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 50 लाखाहून जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाच्या कार्यक्रमात प्राधान्य दिलं जाणार आहे.

शुक्रवारी संसदेत बोलताना केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, "देशात 50 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला मार्च महिन्यात सुरुवात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात एक कोटी सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याचं लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दोन कोटी कोरोना योध्यांना लस देण्यात येणार आहे. काही राज्यात या कार्यक्रमाला दोन फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे."

भविष्यात आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अत्यावश्यक ठरणारा Vaccine Passport काय आहे?

केंद्रीय आरोग्य मंत्री पुढे म्हणाले की, "हे दोन टप्पे पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यामध्ये 50 वर्षावरील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस देण्यात येईल. हा कार्यक्रम मार्च महिन्यात सुरु होईल. थर्ड प्रायोरिटी ग्रुपमध्ये 27 कोटीपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे."

भारताकडून लसीची 22 देशाची मागणी डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, भारताकडून आतापर्यंत 22 देशांनी कोरोनाच्या लसीची मागणी केली आहे. यामध्ये अफगानिस्तान, भूटान, बांग्लादेश, मॉरीशस, श्रीलंका, यूएई, मालदीव, मोरक्को, बहरीन, ओमान, अल्जेरिया, कुवैत आणि दक्षिण अफ्रीका या देशांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 देशांना भारताने कोरोनाची लस दिली आहे. यामध्ये 56 लाख डोस हे ग्रॅंन्टच्या स्वरुपात तर एक कोटी पाच लाख डोस हे कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.

Covid-19 Sero Survey: देशातल्या 21.5 टक्के लोकांना कोरोना होऊन गेला, राष्ट्रीय सीरो सर्व्हेचा अहवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
बँकेत FD करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कोणत्या बँकेत किती मिळतोय व्याजदर? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
भारतापेक्षा दुबईमध्ये सोने स्वस्त का मिळते? ऐकावेळी किती सोने आणता येते? जाणून घ्या सविस्तर माहिती
West Bengal Election : ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर
ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, MATRIZE ओपिनियन पोलची आकडेवारी समोर

व्हिडीओ

Sharad Pawar : पवार कुटुंबाचा प्रमुख म्हणून 'तो' माझा निर्णय, बारामती निवडणुकीवर शरद पवार नेमकं काय म्हणाले?
Sharad Pawar: बारामती निवडणुकीवरुन पार्थ पवारांचा काँग्रेसला इशारा; शरद पवारांचं स्मीतहास्य, एका वाक्यात विषय मिटवला
Dattatray Bharne Speech Baramati : हात जोडून विनंती विरोधी फॉर्म काढून घ्या,हीच दादांंना श्रद्धांजली
Laxman Hake On Baramati Election :आधी निवडणूक लढण्याची गर्जना, आता माघार का? लक्ष्मण हाके म्हणाले...
Anjali Damania PC : राऊत- अंधारेंवर प्रहार; सीडीआर कुठून आला? अंजली दमानियांचा मोठा खुलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baramati by election 2026 Sharad Pawar: 'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
'काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल...' पार्थ पवारांच्या वक्तव्याचा उल्लेख ऐकताच शरद पवार छद्मीपणे हसले, म्हणाले परिपक्वता...
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
Maharashtra Live blog updates: जळगावात एलपीजी गॅस पंपावरील गॅसचे दर महिनाभरात 53 वरून 130 रुपयांवर
CEC Impeachment Row : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील महाभियोग प्रस्ताव फेटाळला, विरोधकांचा संताप
Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
नाशिक कुंभमेळ्यात हजारो कोटींचे टेंडर मॅनेज, सर्वांचे कमिशन फिक्स; लाचखोर अधिकारी विलास लाडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल
US-Iran Tension : एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, पश्चिम आशियातील तणाव वाढला
एका रात्रीत इराणला संपवू शकतो, ती रात्र कदाचित उद्याच... डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
मोगरा फुलला.... पुण्यातील दगडूशेठ गणेश मंदिरात 51 लाख फुलाची सजावट, बाप्पांचे मनमोहक रुप
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
नांदेडमध्ये मॉर्निंग वॉक गेलेल्या सोनूला संपवलं, हत्येचं कारण समोर; प्रेमसंबंधाची किनार, वडिलांची फिर्याद
Wealth Inequality India : धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
धक्कादायक! देशातील 1 टक्के लोकांकडे 40 टक्के संपत्ती, फक्त 1,688 श्रीमंतांकडे देशाच्या 50 टक्के संपत्ती
Embed widget