नवी दिल्ली : देशातील कोरोनाचे संकट अद्याप कमी झालं नसलं तरी कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाने मात्र गती घेतल्याचं दिसून येतंय. आपल्या राज्यातील 100 टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याची कामगिरी गोव्याने केली आहे. अशा प्रकारची कामगिरी करणारे ते हिमाचल प्रदेश नंतर देशातील दुसरं राज्य आहे. देशामध्ये लसीकरणाच्या कार्यक्रमाने आता 73 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 


गोव्यामध्ये सर्व नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील सर्व आरोग्य सेवकांचे आणि नागरिकांचे आभार मानले आहेत. राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी केलेल्या अविरतपणे केलेल्या कष्टाचे हे फळ असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गोव्याच्या या कामगिरीची स्तुती केली आहे. 


 






भारतात 73 कोटी लोकांचे लसीकरण
भारतातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने चांगलाच वेग घेतला असून 73 कोटी डोसचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी संध्याकाळी याबाबतची आकडेवारी जारी केली. त्यामध्ये सांगिलं आहे की, देशातील 55.58 कोटी नागरिकांना लसीचा पहिला डोस आणि 17.38 कोटी नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. देशातील 18 टक्के नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 


देशातील 35 जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा दर 10  टक्क्यांपेक्षा अधिक आहे. तर 30 जिल्ह्यात हा दर 5 ते 10 टक्क्यांमध्ये आहे. 


संबंधित बातम्या :