WhatsApp Privacy Update: फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी व्हॉट्सअॅपबाबत (WhatsApp) मोठी घोषणा केली आहे. ते शुक्रवारी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, “आम्ही व्हॉट्सअॅपमध्ये गोपनीयता आणि सुरक्षिततेचा आणखी एक स्तर जोडत आहोत. यात बॅकअपसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन पर्याय समाविष्ट आहे. जे लोक Google ड्राइव्ह किंवा iCloud मध्ये संग्रहाचा पर्याय निवडू शकतात.
मार्क झुकरबर्ग म्हणाले, "व्हॉट्सअॅप ही पहिली जागतिक मेसेजिंग सेवा आहे, जी एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड मेसेजिंग आणि (end-to-end encrypted messaging and backups) बॅकअप देते. वास्तवात हे कठीण तांत्रिक आव्हान होते, ज्यासाठी ऑपरेटिंग सिस्टममधील स्टोरेज (key storage) आणि क्लाउड स्टोरेजसाठी (cloud storage) पूर्णपणे नवीन फ्रेमवर्क आवश्यक होते.
बीटा टेस्टर्स आणि रोजच्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होण्यापूर्वी व्हॉट्सअॅपने (WhatsApp) नवीन तंत्रासह व्यापक तंत्रज्ञानाची निर्मिती करण्यासाठी या एंड-टू-एंड एन्क्रिप्शनची घोषणा केली आहे.
व्हॉट्सअॅपचे नवीन वैशिष्ट्य एक पर्यायी वैशिष्ट्य म्हणून रिलीज केले जाईल आणि येत्या काही आठवड्यांत इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म iOS आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी आणले जाईल.
सध्या, व्हॉट्सअॅपचे बॅकअप व्यवस्थापन अॅपल आयक्लॉउड Apple iCloud किंवा गुगल ड्राइव्हवर Google Drive व्हॉट्सअॅप डेटाचे बॅकअप (चॅट मेसेज, फोटो इ.) साठवण्यासाठी अवलंबून आहे.
दीड महिन्यात तब्बल 30 लाख अकाऊंटवर बंदी
सुरक्षेच्या कारणास्तव WhatsApp ने 16 जून ते 31 जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत तब्बल 30 लाख 27 हजार अकाऊंटवर बंदी आणली आहे. तसेच एकूण 594 अकाऊंटच्या तक्रारी आल्याअसून त्यावर काय कारवाई करायची याचा विचार सुरु असल्याचं WhatsApp ने आपल्या अहवालात स्पष्ट केलंय. त्या आधी 15 मे ते 15 जून या एक महिन्याच्या कालावधीत WhatsApp ने 20 लाख अकाऊंटवर बंदी आणली होती.
WhatsApp ने जारी केलेल्या अहवालात सांगितलं आहे की, भारतीय फोन क्रमांकाची ओळख ही +91 या क्रमांकावरुन केली जाते. ऑटोमेटेड किंवा बल्क मेसेंजिग म्हणजे स्पॅमच्या चुकीच्या वापराबद्दल जवळपास 95 टक्के अकाऊंटवर बंदी आणण्यात आली आहे असं WhatsApp ने सांगितलं आहे. जगभराचा विचार करता सुरक्षेच्या कारणास्तव आणि गैरवापराला आळा घालण्यासाठी WhatsApp कडून दर महिन्याला सरासरी 80 लाख अकाऊंटवर बंदी आणली जाते असं या अहवालातून स्पष्ट होतंय.