मुंबई : राज्यात आज  4,154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 524  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 91 हजार 179  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 05 टक्के आहे. 


राज्यात आज 44 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.  राज्यात सध्या 49 हजार 812 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 213 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 57,02,628 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,91,179 (11.65 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,96,579 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,952  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ-उतार जरी दिसत असला तरी अद्याप कोरोनाच्या संकटाचे ढग कायम आहेत. गेल्या काही दिवासांपासून देशातील रुग्णसंख्या ही 30 ते 40 हजारांच्या दरम्यान वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गुरुवारी देशात 34 हजार 976 नव्या रुग्णांची भर पडली तर 260 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासात 37,681 जण कोरोनामुक्त झाले. काल एकाच दिवसात देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही जवळपास तीन हजारांनी कमी झाली. त्या आधी बुधवारी देशात देशात 43,263 कोरोनाबाधितांची भर पडली होती तर 338 जणांना आपला प्राण गमवावा लागला होता. 


देशातील कोरोनाची सद्यस्थिती : 



  • कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 31 लाख 74 हजार 954

  • एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 23 लाख 42 हजार 299

  • सक्रिय रुग्णांची एकूण संख्या : तीन लाख 90 हजार 646

  • एकूण मृत्यू : चार लाख 42 हजार 009

  • एकूण लसीकरण : 72 कोटी 37 लाख 84 हजार 586 लसीचे डोस