Corona Update : जगभरातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोना (Corona) झपाट्याने पसरत आहे. चीनमध्ये तर परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्यामुळे सर्वच देशांमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. भारतात अजून तरी कोरोनाची चौथी लाट आलेली नाही. परंतु, कोरोना महामारीचे गांभीर्य ओळखून भारतात देखील महत्वाचे निर्णय घेतले आहेत. भारताशेजारील देशांमधून येणाऱ्या सहा देशांतील प्रवाशांना आरटीपीसीआर (RTPCR) चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. 


Corona Update : या देशातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर सक्तीची


चीन, हाँगकाँग,जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर आणि थायलंड या देशांमधून भारतात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर  चाचणी होणार आहे. 1 जानेवारी 2023 पासून हा नियम लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.  




Corona Update : निगेटिव्ह आलावल सादर करावा लागणार


आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारीपासून या देशातून येणाऱ्या प्रवाशांनी आपली आरटीपीसीआर चाचणी करून त्याचा निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर अपलोड करायचा आहे. नव्या वर्षात चीनमध्ये परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. 


Corona Update :  आतापर्यंत तीन प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठवले


आरोग्या विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या कोविड संदर्भातील आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सूचनेनुसार 24 डिसेंबर 2022 पासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांचे सर्वेक्षण  सुरु करण्यात आले आहे.  यामध्ये सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यात येत होते. यासाठी दोन टक्के प्रवाशांचे नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात येत होते. यापैकी कोविड बाधित आलेला प्रत्येक नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येत आहे. परंतु, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आता या सहा देशांमधून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी करावी लागणार आहे. आतापर्यंत परदेशातून येणाऱ्या 79688 प्रवाशी परदेशातून भारतात आले आहेत यातील 1466 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यातील तीन प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेत.   


महत्वाच्या बातम्या


दोन दिवसांत परदेशातून येणाऱ्या 39 प्रवाशांना कोरोना, विमान प्रवासासाठी केंद्राच्या नवीन गाईडलाईन्स