Brahmos Air Launched Missile: भारत सातत्याने आपली लष्करी ताकद वाढवत आहे. कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यासाठी भारत आपली क्षेपणास्त्र (Brahmos Missile) क्षमता सुधारण्यात गुंतला आहे. यातच भारतीय हवाई दलाने ब्रह्मोस एअर (Brahmos Air) क्षेपणास्त्र (BrahMos Air-Launched Missile) लॉन्च केलं असून याच्या विस्तारित क्षमतेची यशस्वी चाचणी केली आहे. बंगालच्या उपसागरातील Su-30 MKI विमानातून लक्ष्यावर अचूक मारा करून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. सुखोई विमानाचे प्रक्षेपण ठरल्याप्रमाणे झाले आणि क्षेपणास्त्राने थेट बंगालच्या उपसागरातील लक्ष्यावर हल्ला केला. हे क्षेपणास्त्र 450 किमी लांब (Range of Brahmos Missile is 450-km) असलेल्या लक्ष्यालाही भेदू शकतं.




Brahmos Air Launched Missile:  ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या विस्तारित क्षमतेची यशस्वी चाचणी


सुखोई-30 एमकेआय (Su-30MKI) विमानाच्या चांगला कामगिरीसह हवेतून प्रक्षेपित केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्राची (Brahmos Missile) विस्तारित क्षमता भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढवणार आहे. यापूर्वी 29 नोव्हेंबर रोजी भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. भारतीय लष्कराच्या अंदमान-निकोबार द्वीपसमूह कमांडने ही चाचणी केली होती.






How did the BrahMos missile get its name?: ब्रह्मोस क्षेपणास्त्राला हे नाव कसे मिळाले? 


ब्रह्मोस (Brahmos) भारताच्या (India) संरक्षण संशोधन, विकास संस्था (DRDO) आणि रशियाच्या फेडरल स्टेट युनिटरी एंटरप्राइझ NPOM यांच्यातील संयुक्त करारांतर्गत विकसित केले गेले आहे. ब्रह्मोस (Brahmos Missile) हे मध्यम रेंजचे स्टेल्थ रामजेट सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र युद्धनौका, पाणबुडी, विमान किंवा जमिनीवरून डागता येते. भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मॉस्क्वा नदी या दोन नद्यांच्या नावावरून या क्षेपणास्त्राला नाव देण्यात आले आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्राद्वारे (Brahmos Missile) जल, जमीन आणि आकाशात भारताचे सुरक्षा चक्र खूप मजबूत झाले आहे. या क्षेपणास्त्रात शत्रूचे तळ क्षणात नष्ट करण्याची ताकद आहे. या क्षेपणास्त्राची हवाई प्रक्षेपण व्हर्जन 2012 मध्ये समोर आले होते आणि 2019 मध्ये ते भारतीय हवाई दलाच्या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या क्षेपणास्त्राची रेंज आणखी वाढवण्याची योजना आहे.




दरम्यान, आता लढाऊ विमानाची कोणत्याही महामार्गावर इमर्जन्सी लँडिंग करणं देखील शक्य झालं आहे. भारतीय हवाई दलाने आज आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात NH-16 वर नव्याने बांधलेल्या इमर्जन्सी लँडिंग सुविधेवर सर्किट, अ‍ॅप्रोच आणि ओव्हरशूटसह उड्डाणाचा सराव केला आहे.