नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्गाच्या अनियंत्रित वेगामुळे आणि रोजच्या रोज लाखांमध्ये वाढ होणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे देशातील परिस्थिती अत्यंत भयावह बनली आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत प्राणघातक असल्याचे सिद्ध होत आहे. यात गेल्या काही दिवसात दररोज साडेतीन हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. दरम्यान केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय राघवन यांनी बुधवारी तिसर्‍या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच तिसरी लाट नक्की येणार असा दावाही त्यांनी केला आहे. 


विजय राघवन यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या बऱ्यास केसेस समोर येत आहेत. दुसऱ्या लाटेत संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट कधी येईल हे सांगता येणार नाही. पण ती नक्की येणार हे नक्की आहे. त्यामुळे आपल्याला तिसऱ्या लाटेच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहिलं पाहिजे. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलं की कोरोनाची तिसरी लाट टाळता येणार नाही.


कोरोना RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार






कोरोनाची लस अपडेट करण्याची आवश्यकता लागणार आहे. जेणेकरुन या नवीन कोरोनाच्या स्ट्रेनचा सामना करता येऊ शकेल. आपल्याला नव्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लस अपग्रेड करण्याबरोबरच सर्व्हिलान्सचीही आवश्यकता असेल, असं विजय राघवन यांनी म्हटलं.


Corona Crisis: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशासमोर पुन्हा एकदा संकट: RBI गव्हर्नर शक्तिकांत दास


 कोरोना लसीकरणाबाबत विजय राघवन म्हणाले की, 18 ते 44 वर्षे वयोगटातील 6 लाख 71 हजार लोकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने माहिती दिली की महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि उत्तर प्रदेशसह 12 राज्यात एक लाखाहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत.


इतर बातम्या