कल्याण : कोरोनाच्या चाचणीसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक उल्हासनगरमधील छोटछोट्या घरांमध्ये जमिनीवर सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे. स्वॅग स्टिक पॅकिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पालिका प्रशासनासह पोलिसांनी तातडीने धाड टाकली. या संपूर्ण प्रकाराचा पोलीस अधिक तपास करत आहेत.


कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी कोरोनाची अँटिजन किंवा RTPCR टेस्ट केली जाते. यासाठी टेस्ट वापरल्या जाणा्ऱ्या टेस्ट कीटमध्ये एक स्वॅब स्टिक असते. कोरोना तपासणीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेले कीटच वापरले जातात. टेस्टिंगसाठी लागणारा स्वॅब रुग्णाच्या स्वॅबमधून स्टिक द्वारे काढला जातो. या स्वॅब स्टिक घराघरातच पॅकिंग केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरमधील ज्ञानेश्वरनगरमध्ये उघडकीस आला आहे.


दरम्यान काही महिलांसह लहान मुलं देखील ही पॅकिंग करत होते. स्वॅब किट पॅकिंग करताना ना कुणी मास्क घातलं होत किंवा कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणरे किट कितपत सुरक्षित आहेत, असं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दुपारच्या सुमारास उल्हासनगर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त,उपायुक्त, वैद्यकीय अधिकारी तसेच उल्हासनगर पोलिसांनी ज्ञानेश्वरनगरमधील घरांमध्ये धाड टाकली. यावेळी घराघरात जाऊन तपासणी करत काही घरातून स्वॅब स्टिकचा साठा ताब्यात घेण्यात आला.


परिसरातील 10 ते 15 घरात या स्टिकची पॅकिंग केली जात होती. दिवसाला एका घरात पाच हजार स्टिक पॅकिंग केली जात होते. या नागरिकाना हे स्टिक पॅकिंगसाठी कुणी दिले त्याचा शोध पोलीस करत आहेत. तर याबाबत एफडीएला अहवाल देणार असून त्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं उल्हासनगर महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. 


इतर बातम्या