Coronavirus Cases India : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत एका दिवसातील सर्वाधिक मृतांचा आकडा समोर आला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 382,315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 3780 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. दरम्यान, 3,38,439 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशात यापूर्वी एक मे रोजी 3689 सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. 


देशातील आजची कोरोना स्थिती


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 6 लाख 65 हजार 148
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 69 लाख 51 हजार 731
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 34 लाख 87 हजार 229
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 26 हजार 188
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 15 कोटी 49 लाख 89 हजार 635 डोस


राज्यात काल पुन्हा नवीन कोरोना रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्यांचा आकडा जास्त


राज्यात लॉकडाऊन लावल्याचा थोडाफार परिणाम आता दिसू लागला आहे. राज्यात नवीन कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 60 हजारांच्या खाली आला आहे. काल राज्यात 51 हजार 880 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे काल राज्यात तब्बल 65 हजार 934 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.16% एवढे झाले आहे. राज्यात काल 891 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,81,05,382 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 48,22,902 (17.16 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.


राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये वाढ


टेस्टिंगमध्ये कुठेही घट न होता. कोरोनाची रुग्णवाढ, पॉझिटिव्हीटी रेट, मृत्यूदर, डिस्चार्स झालेल्या रुग्णांची कमी होत आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 84.7 टक्के आहे तर देशाचा रिकव्हरी रेट हा 81 टक्के आहे. त्यामुळे  राज्याचा रिकव्हरी रेट हा देशापेक्षा जास्त आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. 


राज्यात 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घट


राज्यातील सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये त्यात वाढही होत आहे. लसीकरणाला वेग देण्यासाठी लसींचा पुरवठा आवश्यक असून आज राज्यात कोविशिल्डचे 9 लाख डोस प्राप्त झाले आहेत. त्याद्वारे 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरण केले जाईल. तर 18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी सुमारे 18 लाख डोसेससाठी खरेदी आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.


राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, भंडारा, ठाणे, नाशिक, लातूर, नंदूरबार, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, रायगड, उस्मानाबाद, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांमधील दैनंदिन नवीन रुग्णसंख्या कमी झाली आहे. महाराष्ट्राचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


AP Coronavirus Strain | धडकी भरवणारी बातमी, कोरोनाचा नवीन म्युटेंट 'N440K' इतर स्ट्रेनपेक्षा 10 पट अधिक संसर्गजन्य