एक्स्प्लोर

पंजाबचा विजय काँग्रेसचा की कॅप्टन अमरिंदर सिंहांचा?

चंदीगड : पंजाबचा विजय काँग्रेसला मोठा दिलासा देणारा आहे. सततच्या पराभवाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये या विजयाने उत्साह नक्कीच संचारला असेल. सत्ताधारी अकाली दल आणि भाजपवर मात करत काँग्रेसने अमरिंदर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पंजाबची सत्ता काबीज केली. वाढदिवसाच्या दिवशीच काँग्रेसचे कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रीपदाचं गिफ्ट मिळालं. विशेष म्हणजे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना आपल्याच टीमच्या कॅप्टनवर विश्वास नव्हता. 117 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने 77, आप 20 आणि अकाली दल 15, तर भाजपने 3 जागा मिळवल्या. अकाली दल-भाजपचा पराभव कशामुळे? अकाली दल आणि भाजपच्या युती सरकारवर पंजाबमध्ये नाराजी होती. रोजगार, शेत मालाला भाव आणि जो ड्रग्ज माफियांना तुरुंगात पाठवेल असा, नेता पंजाबला हवा होता. त्यामुळे सरदारांनी 77 जागा काँग्रेसच्या पारड्यात टाकत अखेर बदल केलाच. भाजपला रामराम केलेल्या नवज्योत सिंह सिद्धुचाही काँग्रेसला फायदा झाला. कारण अमृतसर परिसरातल्या पाचही जागा काँग्रेसने जिंकल्या. त्यामुळे सिद्धूंना उप मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागू शकते. तर 80 जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या 'आप'ला पंजाबच्या मतदारांनी नाकारलं. अकाली दल आणि भाजपची पंजाबमध्ये धुळधाण झाली. तर बादल कुटुंबियांच्या सदस्यालाही पराभव दाखवला. मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल वयाच्या 89 व्या वर्षी निवडून येत पंजाबचे सर्वात वयोवृद्ध उमेदवार ठरले, उपमुख्यमंत्री सुखबिर बादल, ड्रग्ज माफियाचा आरोप असलेले बिक्रमसिंह मजेठिया विजयी झाले आहेत. तर सुनबाई हरप्रित कौर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. विजय काँग्रेसचा की कॅप्टन अमरिंदर सिंहांचा? पंजाबचा विजय काँग्रेसला मोठा बूस्ट देणारा आहे. कॅप्टन अमरिंदर सिंहाच्या आश्वासनावर विश्वास ठेवत सरदारांनी काँग्रेसला विजयी केलं आणि अकाली दल-भाजप युतीला पराभव दाखवला. पण काँग्रेसच्या या विजयावर एक प्रश्नचिन्ह आहे, ते म्हणजे हा विजय काँग्रेस पक्षाचा आहे की, कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा? अमरिंदर सिंह यांनी पक्षाच्या विरोधात जात विविध डावपेच आखले. सिद्धूंना पक्षात घेत अमरिंदर मतदार संघात काँग्रेसची ताकद आणखी मजबूत केली. शिवाय ड्रग्जच्या मुद्द्यावर सरदारांचं मनपरिवर्तन करण्यात त्यांना यश आलं.

महत्त्वाच्या बातम्या

श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान
श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान
Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
सूनेने नोकराकडून करोडपती सासऱ्याला संपवले; कारण समोर येताच पोलिसही चक्रावले, थरकाप उडवणारी घटना
Kanpur Businessman Vineet Minocha Death Case: सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!
सूनेची नोकरासोबत चॅटिंग, करोडपती व्यावसायिकाच्या मृत्यू प्रकरणात सगळ्यात मोठा ट्विस्ट, पोलिसही चक्रावले!
Riya Talukdar Case: वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड
वर्षभराआधी लग्न, पतीने 25 वर्षीय पत्नीला संपवलं; फ्रीज उघडताच मुंडकं पाहून पोलिसही हादरले, आसाममधील थरारक कांड

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget