जयपूर: काँग्रेसमध्ये कायम सक्रिय असणाऱ्या नेत्याकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्यात यावं अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली आहे. राहुल गांधींकडे पक्षाचे अध्यक्षपद देण्यात यावे अशीही मागणी काही नेत्यांनी केली. उदयपूर या ठिकाणी काँग्रेसचे तीन दिवसाचे चिंतन शिबिर सुरू असून त्यामध्ये पक्षाच्या अध्यक्षपदाचा तिढा सोडवावा अशी मागणी नेत्यांनी केली. 


जवळपास 9 वर्षांनी म्हणजे 2013 नंतर काँग्रेससचे चिंतन शिबिर होत आहे. त्यामध्ये संघटना, संघटनात्मक बांधणी आणि 2024 सालच्या निवडणुका यावर चर्चा सुरू आहे. यामध्ये अध्यक्षपदाचा मुद्दाही चर्चेत आला. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर तब्बल तीन वर्षे काँग्रेसचे अध्यक्षपद हे हंगामी असं आहे. प्रकृत्ती अस्वास्थामुळे सोनिया गांधी जरी सार्वजनिक कार्यक्रमात जास्त सक्रिय नसल्या तरी त्यांनी हे हंगामी अध्यक्षपद सांभाळलं आहे. त्यामुळे आता पक्षामध्ये कायम सक्रिय असलेल्या नेत्याकडे अध्यक्षपद देण्यात यावं अशी मागणी अनेक नेत्यांनी केली आहे. 


अध्यक्षपदाचा मुद्दा चर्चेत आल्यानंतर काही जणांनी राहुल गांधी यांनीच हे अध्यक्षपद स्वीकारावं अशी मागणी केली. काँग्रेसचे हे चिंतन शिबिर अजून दोन दिवस चालणार आहे. पुढच्या दोन दिवसात काय घडामोडी काय घडामोडी घडतायत हे याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 


दरम्यान, या चिंतन शिबिरामध्ये ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल आणि गुजरातमधील नेते हार्दिक पटेल उपस्थित नसल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 


काँग्रेसच्या या शिबिरामध्ये कमालीची गोपनीयता पाळली जात आहे. या शिबिरात विविध समित्यांच्या बैठका पार पडणार आहेत. या समित्यांच्या बैठकांवेळी प्रत्येकाला आपापले मोबाईल बाहेर लॉकअपमध्ये ठेवून जायला सांगण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :