एक्स्प्लोर
Advertisement
अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर
नवी दिल्ली : बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेल्या संघटनात्मक निवडणुकांसाठी अखेर काँग्रेसच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यामुळे राहुल गांधींचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राज्याभिषेक होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.
नियमानुसार दर पाच वर्षांनी काँग्रेसला अंतर्गत निवडणूक घ्यावी लागते. काँग्रेसची ही संघटनात्मक निवडणूक डिसेंबर 2015 पर्यंत होणं अपेक्षित होतं. पण आत्तापर्यंत यासाठी तीनवेळा मुदतवाढ मागत काँग्रेसनं चालढकल केली.
अखेर आज काँग्रेसचे निवडणूक अधिकारी आणि लोकसभा खासदार मुलापल्ली रामचंद्र यांनी मुदतवाढीला नकार दिला. तसेच 15 ऑक्टोबरपर्यंत नवा अध्यक्ष निवडू असं जाहीर केलं.
त्यामुळे पक्षांतर्गतच्या निवडणूक आयोगाच्या फटकाऱ्यानंतर काँग्रेसचा सुस्तावलेला अजगर हालचाल करु लागला आहे. 16 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या काळात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, यावेळी राहुल गांधीचं भवितव्य ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement