Congress News : काँग्रेसचं आजपासून चिंतन शिबिर, महत्वाच्या सहा प्रस्तावावर होणार चर्चा, महाराष्ट्रातील 'हे' नेते राहणार उपस्थित
आजपासून काँग्रेसच्या तीन दिवसीय चिंतन शिबिराला सुरुवात होणार आहे. यासाठी देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित असणार आहेत. यामध्ये महत्त्वाच्या सहा विषयावरती सखोल चर्चा केली जाणार आहे.
Congress News : आजपासून काँग्रेस पक्षाच्या चिंतन शिबिराला सुरुवात होणार आहे. उदयपूरमध्ये तीन दिवस हे शिबीर चालणार आहे. या तीन दिवसीय या चिंतन शिबिरामध्ये देशभरातील काँग्रेसचे नेते उपस्थित असणार आहेत. विशेषता महत्त्वाच्या सहा विषयावरती सखोल चर्चा केली जाणार आहे. राजकीय, सामाजिक न्याय आणि विकास, अर्थव्यवस्था, संघटन, शेतकरी आणि कृषी, तरुण आणि रोजगार या सहा विषयावर चर्चा यामध्ये चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी देशभरातील काँग्रेसचे नेत्यांची कमिटीही तयार करण्यात आलेली आहे. दरम्यान, चिंतन शिबिरासाठी महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री यशोमती ठाकूर तसेच आमदार प्रणिती शिंदे आणि इतर सचिव उपस्थित राहणार आहेत.
आजपासून होणाऱ्या चिंतन शिबिरात प्रत्येक राज्याचा आढावा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी आणि काँग्रेस या विषयावर सुद्धा सखोल चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.
या चिंतन शिबिरात महत्त्वाच्या सहा प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पाहुयात कोणत्या कमिटीवर कॉंग्रेसचे कोणते नेते आहेत.
राजकीय
1) मल्लिकार्जुन खरगे
2) गुलाब नबी आजाद
3) अशोक चव्हाण
4) उत्तम कुमार रेड्डी
5) शशी थरूर
6) गौरव गोगाई
7) सप्तगिरी शंकर उल्का
8) पवन खेरा
9) रागिनी नायक
सामाजिक न्याय आणि विकास
1) सलमान खुर्शीद
2) मीरा कुमार
3) दिग्विजय सिंग
4) कुमारी सेलजा
5) सुखविंदर सिंग रंधावा
6) नबम तुकी
7) नरनभाई राठवा
8) अँटो अँटोनी
9) के राजू
अर्थव्यवस्था
1) पी चिदंबरम
2) सिद्धरामय्या
3) आनंद शर्मा
4) सचिन पायलट
5) मनीष तिवारी
6) राजीव गोवडा
7) प्रणिती शिंदे
8) गौरव वल्लभ
9) सुप्रिया श्रिनाते
संघटन
1) मुकुल वासनिक
2) अजय मकान
3) तारिक अन्वर
4) रमेश चेनिथाला
5) रणदीप सुरजेवाला
6) अधीर रंजन चौधरी
7) नीता डिसूजा
8) मीनाक्षी नटराजन
शेतकरी आणि कृषी
1) भूपेंद्र सिंग हुडा
2) टी एस सिंग देव
3) शक्ती सिंग गोहिल
4) नाना पटोले
5) प्रताप सिंग बाजवा
6) अरुण यादव
7)अखिलेश प्रसाद सिंग
8) गीता कोरा
9) अजय कुमार लल्लु
युवा आणि रोजगार
1) अरमिंदर सिंह
2) बी नाही श्रीनिवास
3) नीरज कुंदन
4) कृष्णा बायरे गोवडा
5) कृष्णा अल्वरु
6) अल्का लांबा
7) रोजी जॉन
8) अभिषेक दत्त
9) करिष्मा ठाकूर
10) अंकिता दत्त
या महत्त्वाच्या सहा प्रस्तावावर काँग्रेसचे नेते चर्चा करतील, चिंतन करतील आणि त्यानंतर पुढची रणनिती आखली जाईल. देशभरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट भुमिका देण्याचं काम केल जाईल. त्यामुळे काँग्रेसच्या या चिंतन शिबिरकडे सगळ्यांचं लक्ष लागल आहे. हे चिंतन शिबिर अगामी निवडणुकांसाठी काँग्रेसला फलदायी ठरेल असं अनेक नेत्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हे चिंतन शिबीर होणार आहे. या शिबिरात काँग्रेसचे 430 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस संघटना मजबूत करण्यावर या शिबिरात चर्चा होणार आहे. चिंतन शिबिराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या नेत्यांनी सर्व तयारी केली आहे. या शिबिरात महत्त्वाचे मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसकडून यापुढे आता एक परिवार, एक तिकीट असा फॉर्म्युला राबवला जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.