एक्स्प्लोर

Jignesh Mewani Arrested : काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांना गुजरातमध्ये आसाम पोलिसांकडून अटक; आज गुवाहाटीला नेणार

Jignesh Mewani Arrested : काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांना गुजरातमधून आसाम पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. एका ट्वीट प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.

Jignesh Mewani Arrested : गुजरातमधील काँग्रेसचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी अटक केली आहे. गुजरातमधील वडगाममधून मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आसाममध्ये दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंगाने आसाम पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आज त्यांना गुवाहाटीमध्ये नेण्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या कारवाईचा निषेध केला आहे. 

आमदार जिग्नेश मेवाणी यांना पालनपुर सर्किट हाऊसमधून बुधवारी रात्री अटक केली.  अटक केली तेव्हा त्यांना एफआयआरची प्रत पोलिसांनी दाखवली नसल्याचे जिग्नेश मेवाणी यांच्या टीममधील एकाने सांगितले. मात्र, दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत माहिती दिली. मेवाणी यांना रात्रीच अहमदाबाद येथे नेण्यात आले होते. मेवाणी यांना आज, गुरुवारी गुवाहाटी नेण्यात येणार आहे. 

जिग्नेश मेवाणी यांनी काय म्हटले?
 
जिग्नेश मेवाणी यांनी म्हटले की, एका ट्वीटमुळे अटक करण्यात आली.  पोलिसांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही. माझ्याविरोधात खोटी तक्रार दाखल करण्यात आली असून मी घाबरणार नाही. मी माझी लढाई सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

काँग्रेस कार्यकर्ते संतप्त

मेवाणी यांना अटक केल्याचे समजताच काँग्रेस कार्यकर्ते, मेवाणी समर्थकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांच्यासह अनेक आमदार अहमदाबाद विमानतळावर पोहचले. त्यांनीदेखील जिग्नेश मेवाणींच्या समर्थनात आणि आसाम पोलिसांविरोधात घोषणाबाजी केली. 

जगदीश ठाकोर यांनी सांगितले की, जिग्नेश यांच्याविरोधात आरएसएसविरोधात ट्वीट केल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका आमदाराला धमकावण्याचा हा प्रयत्न आहे. अशा तक्रारींना जिग्नेश मेवाणी अथवा काँग्रेसदेखील घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही कायदेशीर लढाई लढणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल, मिठाई विक्रेते ते बेकर्ससाठी नवीन नियमावली जारी, नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई 
आठ वर्ष नवऱ्याला फसवलं, गुपचूप 12 लाख वाचवलं, पण उंदरानं केला करेक्ट कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल 
आठ वर्ष नवऱ्याला फसवलं, गुपचूप 12 लाख वाचवलं, पण उंदरानं केला करेक्ट कार्यक्रम, व्हिडीओ व्हायरल 
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
पत्नीने घरातील सीसीटीव्ही बंद केला, भावांना बोलून घेतलं, सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीला बेदम मारहाण, दवाखान्यात जीव सोडला, चार महिन्यांपूर्वीच जुळ्यांना जन्म, मुलांना औषध लावण्याच्या वादात कुटुंब उद्ध्वस्त
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
कोल्हापूर : शिरोली एमआयडीसीत प्लास्टिक स्क्रॅप यार्डला भीषण आग; तब्बल 5 ते 10 किमीवर अंतरावरून धुराचे लोट दिसू लागले
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
रोहित पवारांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; पोलिसांचा तपास सुरू, आत्तापर्यंत काय-काय आलं समोर?
Embed widget