एक्स्प्लोर

राहुल गांधींनी फटकारल्यानंतर सीपी जोशींकडून खेद व्यक्त

नाथद्वारामध्ये एका सभेदरम्यान सीपी जोशी यांनी नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जात आणि धर्मावर प्रश्न उपस्थित करुन निशाणा साधला होता.

जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीआधी प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच उमा भारती यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर, टीकेचे धनी बनलेले माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीपी जोशी यांनी अखेर खेद व्यक्त केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी फटकरल्यानंतर सीपी जोशी यांनी ट्विटरच्या माध्यमातून खेद व्यक्त केला. नाथद्वारामध्ये एका सभेदरम्यान सीपी जोशी यांनी नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जात आणि धर्मावर प्रश्न उपस्थित करुन निशाणा साधला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोशींचं विधान पक्षाला अडचणीत टाकू शकतं, हे लक्षात आल्यावर राहुल गांधींना डॅमेज कंट्रोलसाठी समोर यावं लागलं. सीपी जोशी यांचं विधान काँग्रेस पक्षाच्या आदर्श आणि तत्त्वांच्या विपरित असल्याचं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधींची तंबी सीपी जोशी यांच्या विधानानंतर राहुल गांधींनी त्यांना खेद व्यक्त करण्यास सांगितलं. गांधींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "सीपी जोशी यांचं वक्तव्य काँग्रेस पक्षाच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे. पक्षाच्या नेत्यांनी असं कोणतंही विधान करु नये ज्यामुळे समाजातील एखाद्या घटकांच्या भावना दुखावतील. काँग्रेसच्या मूल्यांचा, कार्यकर्त्यांच्या भावनांना आदर करुन जोशी यांना चुकीची जाणीव नक्कीच होईल. त्यांनी आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त करायला हवा." राहुल गांधींच्या निर्देशानंतर जोशींकडून खेद राहुल गांधी यांनी तंबी दिल्यानंतर काही वेळातच सीपी जोशी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या विधानावर खेद व्यक्त केला. त्यांनी लिहिलं आहे की, "काँग्रेसच्या मूल्यांचा आणि कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करत, माझ्या वक्तव्याने समाजाच्या कोणत्याही वर्गाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्यासाठी मी खेद व्यक्त करतो." सीपी जोशी काय म्हणाले होते? सीपी जोशी गुरुवारी (23 नोव्हेंबर) एका सभेत बोलले होते ती, "उमा भारती यांची जात कोणाला माहित आहे का? ऋतंभरा जात कोणाला माहित आहे का? या देशात धर्माबाबत कोणाला माहित आहे तर ते पंडित. देश अजब बनला आहे. या देशात उमा भारती लोधी समाज आहेत आणि त्या हिंदू धर्माची गोष्ट करतात. साध्वीजी कोणत्या धर्माच्या आहेत? त्या हिंदू धर्माची गोष्ट करतात. नरेंद्र मोदी कोणत्या धर्माचे आहेत आणि ते हिंदू धर्माबाबत बोलतात. 50 वर्षात त्यांना अक्कल आली नाही. भाजपचा हल्लाबोल जोशी यांच्या वादग्रस्त विधानानंतर राजकारण तापलं असून भाजपने हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेत्याचं वक्तव्य धक्कादायक आहे. सीपी जोशी यांनी धर्माबाबत असं बोलायला नको होतं, असं ट्वीट भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे. तसंच काँग्रेस फोडाफोडीच्या राजकारणाला प्रोत्साहन देत असल्याचंही भाजपने म्हटलं आहे. तर वाद वाढल्यावर माझ्या वक्तव्याचा भाजपने विपर्यास केल्याचा आरोप सीपी जोशी यांनी ट्विटरवर केला आहे. भाजपने माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने सादर केलं असून मी त्याचा निषेध करतो, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
99 टक्के सरकारी नोकऱ्यांमध्ये घोटाळा, विशिष्ट जाती, वर्गातील लोकांनाच झुकतं माप, बाबा रामदेव यांचा गंभीर आरोप, पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Embed widget