एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

दिल्लीत रेकॉर्डब्रेक थंडी, पारा 2.4 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला

गेल्या 120 वर्षांत केवळ चार वेळा डिसेंबरमधील कमाल तापमानाचा पारा 20अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. डिसेंबर महिन्यातील कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी 1919, 1929, 1961 आणि 1997 मध्ये दिल्लीकरांनी अनुभवलं होतं.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत सध्या थंडीची लाट पसरली आहे. दिल्लीतील थंडीने अनेक वर्षांचे रेकॉर्ड मोडले आहेत. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीतील सफदरजंग परिसरात तापमानाचा पारा 2.4 अंश सेल्सिअसपर्यंत आला आहे. तर दिल्लीतील किमान तापमान 3.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. गेल्या 120 वर्षांत पहिल्यांदा डिसेंबर महिन्यात दिल्लीत एवढी थंडी पडली आहे. याआधी 1901 मध्ये डिसेंबर महिन्यात एवढी थंडी पडली होती.

तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता

दिल्लीत शुक्रवारी किमान 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जे सामान्य तापमानाच्या तीन अंश सेल्सिअसने कमी आहे. तर कमाल तापमान 13.4 अंश सेल्सिअस होतं, जे सामान्य तापमानाच्या सात अंश सेल्सिअसने कमी आहे. यंदाच्या मोसमातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. आज, उद्या या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. डिसेंबर महिन्यातील दोन दशकातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. याआधी 1997 साली पहिल्यांदा दिल्लीकरांनी एवढ्या थंडीचा अनुभव घेतला होता.

गेल्या 120 वर्षांत केवळ चारच वेळा कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस खाली

गेल्या 120 वर्षांत केवळ चार वेळा डिसेंबरमधील कमाल तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. डिसेंबर महिन्यातील कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी 1919, 1929, 1961 आणि 1997 मध्ये दिल्लीकरांनी अनुभवलं होतं. दोन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी कमाल तापमान 19.85 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत कडाक्याची थंडी पसरली आहे. आधी 1997 मध्ये सलग 13 दिवस अशी कडाक्याची थंडी पडली होती.

पुढील आढवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता

पुढील आठवड्यात वाऱ्याची दिशा बदल्यास हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीकरांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. थंडी आणि दाट धुक्यामुळे हवामान विभागाने 29 डिसेंबरपर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget