एक्स्प्लोर
'सीएम निवासस्थानासमोर कोणी आत्महत्या केल्या नाहीत का?'
रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांच्या निवासस्थानासमोर एका दिव्यांग व्यक्तीने आत्महत्या केली असतानाच खुद्द सिंह यांनी आगीत तेल ओतलं आहे. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर कोणी आत्महत्या केल्या नाहीत का, असा सवाल विचारणाऱ्या रमण सिंह यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
एका व्यक्तीने आपल्या निवासस्थानासमोर आत्महत्या केल्याने त्याचं राजकारण केलं जाऊ नये. आतापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर कोणी आत्महत्या केल्या नाहीत का, असं वक्तव्य रमण सिंह यांनी केलं.
योगेश साहू नावाच्या दिव्यांग व्यक्तीने 21 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास म्हणजे जवळपास सहा दिवसांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
योगेश साहू नोकरी मागण्यासाठी सीएम निवासातील जनता दरबार कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर त्याने गेटवरच स्वतःला पेटवून घेतलं. या घटनेत तो 85 टक्के भाजला होता. त्यानंतर आंबेडकर रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या योगेशची आर्थिक स्थितीही फारशी बरी नसल्याचं म्हटलं जात आहे.
काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांविरोधात निदर्शनं करण्यात आली होती आणि त्यांचा पुतळाही जाळला होता. त्यानंतर रमण सिंह यांनी योगेशची भेट घेतली आणि उपचारांचा पूर्ण खर्च राज्य सरकार करेल, असं आश्वासनही त्याला दिलं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement