एक्स्प्लोर
Advertisement
मध्य प्रदेशनंतर छत्तीसगडमध्येही शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी
छत्तीसगडमध्ये नवनिर्वाचित मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली आहे.
रायपूर : सत्तेवर येताच आज सायंकाळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी घोषित केली. त्यानंतर काहीच तासांत छत्तीसगडमध्येदेखील कर्जमाफी घोषित करण्यात आली आहे. छत्तीसगडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी या कर्जमाफीची घोषणा केली आहे.
भुपेश बघेल यांनी आज सायंकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर काही वेळात त्यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली. या बैठकीत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या धान्याला 2500 रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याआधी धान्याला प्रति क्विंटल 1700 रुपये इतका भाव मिळत होता. तसेच झीरम हल्यामध्ये शहीद झालेल्यांना न्याय देण्यासाठी एसआयटी (स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम) तयार केली जाईल, अशी घोषणादेखील बघेल यांनी केली आहे.
कमलनाथ याबाबत म्हणाले की, "आमच्या पक्षाने निवडणुकांच्या प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांची आम्ही पूर्तता करत आहोत. राज्यभर तब्बल 61 हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या धान्याला आम्ही चांगला हमीभाव देणार आहोत."
पहली कैबिनेट मीटिंग के तीन बड़े फैसले -
1. 16 लाख 65 हजार से अधिक किसानों का 6100 करोड़ रूपये का कर्जा माफ. 2. धान का समर्थन मूल्य 2500 रूपये प्रति क्विंटल किया गया. 3. झीरम हमले के शहीदों को न्याय दिलाने के लिए SIT का किया गठन. गढ़बो नवा छत्तीसगढ़ — Bhupesh Baghel (@Bhupesh_Baghel) December 17, 2018
संबधित बातम्या शपथविधीनंतर मुख्यमंत्री कमलनाथ यांचं गिफ्ट, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी भूपेश बघेल यांना छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, शिवराजसिंहांच्या कृतीची प्रशंसा अशोक गेहलोत यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाची शपथChhattisgarh CM Bhupesh Baghel: Congress President Rahul Gandhi had announced that farm loans will be waived within 10 days and that Minimum Support Price (MSP) for maize will be increased to Rs 2500 from Rs 1700 per quintal. These two decisions have been taken today pic.twitter.com/RnC1EUV9TQ
— ANI (@ANI) December 17, 2018
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement