एक्स्प्लोर

चिमुरडीवरील बलात्कार-हत्याप्रकरणी इंजिनिअरला फाशी

कुत्र्यासोबत खेळण्याच्या आमिषाने 23 वर्षीय दशवंतने सात वर्षीय हसिनीवर लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या केली.

चेन्नई : चेन्नईतील सात वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याप्रकरणी 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअरला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. 23 वर्षीय दशवंतने हसिनीवर बलात्कार करुन तिला जाळलं होतं. तामिळनाडूतील चेंगलपेट कोर्टाने अपहरण, हत्येसह पोक्सोअंतर्गत येणाऱ्या कलमांअंतर्गत दशवंतला दोषी ठरवलं होतं. काय आहे प्रकरण? सात वर्षांची हसिनी चेन्नईतील मुगलीवक्कममध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होती. 6 फेब्रुवारी 2017 रोजी ती बेपत्ता झाली. त्याच इमारतीत राहणाऱ्या दशवंतला चेन्नई पोलिसांनी अटक केली. कुत्र्यासोबत खेळण्याच्या आमिषाने नेऊन दशवंतने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि तिची हत्या केली. 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात पोलिस अपयशी ठरले. सप्टेंबर महिन्यात दशवंतला जामीन मिळाला. दशवंतला कोर्टात नेण्यास आठ महिन्यांचा कालावधी लोटला. ऑक्टोबर 2017 मध्ये अखेर चेंगलपेट कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली. आरोपी दशवंतचे वडील विजयकुमार यांनी फेब्रुवारी 2018 पर्यंतचा वेळ मागून घेतला. आपल्याला ऑस्ट्रेलियाला जायचं असल्याचं कारण त्यांनी पुढे केलं होतं. मात्र या कालावधीत पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते, असा संशय हसिनीच्या वडिलांनी व्यक्त केला. सुनावणीच्या काळात दशवंतने हसिनीच्या धाकट्या भावाची हत्या करण्याची धमकी दिल्याचंही हसिनीचे वडील राजेश यांनी कोर्टाला सांगितलं. आईची हत्या करुन दागिने लुटले 2 डिसेंबर 2017 रोजी या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळालं. दशवंतची आई राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात सापडली. दशवंतने आईच्या हत्या करुन दागिन्यांसह पळ काढल्याचं समोर आलं. दागिन्यांची वाटणी त्याने तुरुंगातील सहकैदी डेव्हिड आणि जेम्ससोबत केली. 6 डिसेंबर रोजी पोलिसांनी दशवंतला मुंबईत अटक केली. त्याने शिताफीने पळ काढला, मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा पोलिसांनी त्याला जेरबंद केलं. दशवंतने आपल्या आईची हत्या केल्याची कबुली दिली. धक्कादायक म्हणजे, वडील जर कामावरुन उशिरा आले नसते, तर त्यांनाही संपवलं असतं, असा कबुलीजबाब त्याने दिला. त्यामुळे वडिलांनी त्याला दिलेला कायदेशीर पाठिंबा काढून घेतला. आपल्या मुलावरील प्रेमापोटी त्याला जामीन मिळवून दिला, मात्र त्यानेच आपल्या पत्नीला संपवल्यामुळे पश्चातापाची भावना त्याच्या वडिलांनी बोलून दाखवली.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आता भाजपची राजवट जाणार! भाजप विरुद्ध भारत असा संघर्ष, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले, तरुणांची इतकी भीती का वाटतेय?
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी

व्हिडीओ

Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
आंदोलनाचा वणवा... काँग्रेसने आमदार, खासदारांना दिल्लीत बोलवलं; सरकारविरुद्ध मोठं आंदोलन उभारण्याची तयारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑक्टोबर 2026 | शनिवार
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
गेल्या आठ तासांपासून अभिजित दिपके आशुतोष रांका, सौरभ दासना कुठं कैद केलंय आम्हाला माहीत नाही, जोपर्यंत ज्ञानेश कुमारांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत माघार नाही; सीजेपीनं रणशिंग फुंकलं
Embed widget