Happy New Year 2022 : कोरोना महामारीच्या सावटात जवळपास दोन वर्षे घालवल्यानंतर, 2022 वर्षाची सुरुवातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यासह झाली आहे. मात्र तरीही जगभरात 2022 चे स्वागत जल्लोषात आणि नवीन आशेने केले. देशभरात फटाक्यांची आतषबाजी आणि गजरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईसह देशातील अनेक शहरांमध्ये लोक कोरोनाच्या काळात खबरदारी घेत नवीन वर्ष साजरे करत आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला लोकांनी मंदिरे आणि मठांमध्ये गर्दी केली होती, त्यापैकी बहुतेकांनी मास्क घातले होते. यासोबतच ऐतिहासिक वारसाही दिव्यांनी उजळून निघाला.
ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांमध्ये, प्रशासनाने लोकांना रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, समुद्रकिनारा आणि बारपासून दूर ठेवण्यासाठी निर्बंध लादले आहेत. गोवा आणि हैदराबादमध्ये नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला नसला तरी इतर निर्बंध कायम राहणार आहेत.
सर्वप्रथम, लोकांनी न्यूझीलंडमध्ये नवीन वर्षांचं स्वागत केलं. न्यूझीलंडमध्ये ओमायक्रॉनचा अद्याप समुदायिक स्तरावर प्रसार झालेला नाही. तरीही अधिकारी गर्दी जमू नये यासाठी प्रयत्न करत आहेत. व्हायरस संसर्गाच्या प्रकरणांमध्ये स्फोटक वाढ असूनही शेजारील ऑस्ट्रेलिया देशामध्ये उत्सवाचं वातावरण आहे.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सिडनी हार्बर ब्रिज आणि सिडनी ऑपेरा हाऊस येथे फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळणार आहे. नवीन सुरू होण्याच्या काही तास आधी, ऑस्ट्रेलियन आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की कोरोना संसर्गाची 32,000 नवीन प्रकरणे आढळली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
- नव्या वर्षात ATM मधून पैसे काढणं महागणार, जाणून घ्या बदल
- Happy New Year 2022: नवे वर्ष, नवी आशा; नववर्षासाठी करा 'हे' सोपे संकल्प
- Happy New Year 2022: हटके पद्धतीने द्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा; पाठवा भन्नाट स्टिकर्स आणि जीआयएफ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha