ISRO Moon Mission : इस्रोच्या (ISRO) चंद्र मोहिमेकडे (Lunar Mission) अवघ्या जगाचं लक्ष लागलं आहे. 14 जुलै 2023 रोजी, चांद्रयान-3 नं GSLV-Mk3 रॉकेटमधून उड्डाण केलं. चांद्रयान-3 अवकाशात पोहोचल्यावर त्याच्या लँडरवर बसवलेल्या लँडर इमेजर (Lander Imager - LI) कॅमेरानं पृथ्वीचे काही फोटो घेतले आहेत. चांद्रयानानं पाठवलेल्या या फोटोंमध्ये पृथ्वी खूपच सुंदर दिसते. निळ्या पृथ्वीवर पांढऱ्या ढगांची चादर दिसत आहे. बुधवारी चांद्रयान-3 नं इस्रोला विचारलं होतं की, अजून फोटो पाठवायचे का? त्यानंतर आज चांद्रयाननं इस्रोला फोटो पाठवले आहेत.
चांद्रयान-3 नं काढले पृथ्वी आणि चंद्राचे फोटो
यानंतर, 5 ऑगस्ट रोजी, जेव्हा चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत गेलं, तेव्हा त्याच्या लँडरचा दुसरा कॅमेरा म्हणजेच, लँडर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कॅमेरा (Lander Horizontal Velocity Camera- LHVC) नं चंद्राच्या पृष्ठभागाचे फोटो घेतले होते. दरम्यान, चांद्रयानवर लावण्यात आलेला LI कॅमेरा गुजरातमधील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरनं (SAC) बनवला आहे.
लँडरने पाठवले पृथ्वी आणि चंद्राचे फोटो
LHVC हे इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टम्स (LEOS), बंगळुरूच्या प्रयोगशाळेनं तयार केले आहे. LHVC प्रत्यक्षात लँडरच्या खालच्या भागात बसवले आहेत. हे कॅमेरे विशेषतः पृष्ठभागाचे फोटो टिपतात. जेणेकरून लँडरचा लँडिंग आणि हेलिकॉप्टरप्रमाणे हवेत तरंगण्याचा वेग कळू शकेल. तसेच, धोक्यांचा अंदाज लावता येतो.
अवकाशातून पृथ्वी कशी दिसते?
चंद्रावर कधी उतरणार चांद्रयान-3?
चांद्रयान-3 चं 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथील अंतराळ केंद्रातून यशस्वीरत्या प्रक्षेपण पार पडलं. 1 ऑगस्ट रोजी चांद्रयानाला पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत जाण्यासाठी प्रवास सुरु केला. यानंतर आता चांद्रयान-3 यशस्वीरित्या चंद्राच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत पोहोचलं आहे. चांद्रयान-3 ला ट्रान्सलुनर ऑर्बिट'मध्ये ठेवण्यात आलं आहे. इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान-3 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर उतरेल. चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 'सॉफ्ट लँडिंग' करण्याचा प्रयत्न करेल. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी माहिती देताना सांगितलं होतं की, "जर सर्व काही ठीक पार पडलं तर चांद्रयान 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल."