एक्स्प्लोर
चांद्रयान 2 मोहिमेसाठी भारत सज्ज, मध्यरात्री श्रीहरीकोट्यातून प्रक्षेपण
जवळपास दोन महिन्यांमध्ये 6 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण भागाच्या ध्रुवावर भारताचं हे यान उतरेल.
मुंबई : चंद्राला गवसणी घालण्यासाठी भारत दुसऱ्यांदा सज्ज झाला आहे. चांद्रयान-2 या मोहिमेची सर्व तयारीही पूर्ण झाली आहे. रविवारी मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान चंद्राकडे झेपावणार आहे.
चंद्राच्या दक्षिण भागावर अद्याप कोणत्याही देशाचं यान उतरलं नाही. त्यामुळे भारत अशा प्रकारची मोहीम राबवणारा पहिलाच देश ठरणार आहे. या मोहिमेसाठी भारताला तब्बल 800 कोटी रुपये खर्च आला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या यानाचे सर्व भाग स्वदेशी आहेत. जवळपास दोन महिन्यांमध्ये 6 सप्टेंबरला चंद्राच्या दक्षिण भागाच्या ध्रुवावर भारताचं हे यान उतरेल.
या चांद्रयानाचं आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटामध्ये असलेल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून रविवारी मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमेत जीएसएलव्ही एमके 2 एम या क्षेपणास्त्राचा वापर केला जाणार आहे. या मोहिमेची सर्व चाचणी शुक्रवारी पूर्ण झाली. या मोहिमेत चंद्रावर असलेल्या पाण्याची पातळी, चंद्रावरील जमीन, त्यावर उपलब्ध असलेली खनिजं, रसायनं आणि त्यांचा अभ्यास केला जाणार आहे.
चांद्रयान 1 मोहिमेत भारताने चंद्रावर पाणी असल्याची खात्री केली होती. चांद्रयान मोहिमेत विविध 13 प्रकारची उपकरणंही चंद्रावर पाठवली जाणार आहेत. नासाचं एक पॅसिव्ह पेलोड या मोहिमेचा हिस्सा असेल जो पृथ्वी आणि चंद्रामधील सर्वात कमी अंतर शोधण्याचं काम करेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement