साधा माणूस वाटलो काय?, नारायण राणेंच्या सुरक्षेत वाढ, आता Z दर्जाची सुरक्षा
Narayan Rane : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत आणखी वाढ झाली आहे.
Narayan Rane : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत आणखी वाढ झाली आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने शुक्रवारी केंद्रीय नारायण राणे यांची सुरक्षा 'Y+' वरून 'Z' केली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार गृह मंत्रालयाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षा Z श्रेणीची करण्याचा आदेश केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाला (CISF) दिला. आता नव्या सुरक्षेमुळे 69 वर्षीय नारायण राणे यांच्या सुरक्षेत सीआयएसएफच्या आणखी 6 कमांडोंचा समावेश करण्यात येणार आहे.
सीआईएसएफचे डीआईजी आणि मुख्य प्रवक्ता डॉ. अनिल पांडेय यांनी नारायण राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'Z' श्रेणीच्या सुरक्षेअंतर्गत नारायण राणे यांच्या भारतातील कोणत्याही दौऱ्यावेळी सहा ते सात सशस्त्र कमांडो उपस्थित राहतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांच्या सुरक्षेच्या विश्लेषणानंतर केंद्रीय एजन्सीने सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य केलं होतं. विशेष म्हणजे याप्रकरणी अखेर नारायण राणे यांना रत्नागिरीत अटक देखील झाली होती. तेव्हा राज्यात मोठा गदारोळ माजला होता. राणे विरुद्ध शिवसेना असा थेट वाद समोर आला होता. या सर्व गोष्टीचं विश्लेषण केल्यानंतर केंद्रीय सुरक्षा एजन्सीन राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्र्याला अटक होण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना होती. या घटनेनंतर केंद्र सरकारने या प्रकरणाचा अहवाल मागवला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने नारायण राणेंच्या सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
नारायण राणे यांना आधीपासून CISF कडून 'Y+' सुरक्षा देण्यात येतेय. आता शनिवारपासून नारायण राणे यांचं सुरक्षा कवच अधिक भक्कम होणार आहे. त्यांना 'Z' श्रेणीची सुरक्षा देण्यात येणार आहे. राणेंना गृह सुरक्षा कवचही असेल.
Narayan Rane : 'माझा घसा ठिक होऊ दे, आवाज खणखणीत झाल्यावर खणखणीत वाजवणार' : नारायण राणे
राणे म्हणतात मार्चमध्ये राज्यातलं महाविकास आघाडी सरकार कोसळणार, नारायण राणेंचा दावा खरा ठरणार?
Narayan Rane : नारायण राणेंच्या अटकेची आखणी सोमवारीच, तीही वर्षा बंगल्यावरुन! सूत्रांची माहिती
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live