एक्स्प्लोर

पिकांना वाढीव दर मिळणार, केंद्र सरकारची नवी हमीभाव योजना

शेतकऱ्यांवर हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रामुख्याने ही योजना असेल.

नवी दिल्ली : पिकांना सध्या जो हमीभाव देण्यात आला आहे, त्यापेक्षाही जास्त दर मिळण्यासाठी केंद्र सरकारने बाजार हमीभाव योजना आणण्याच्या तयारीत आहे. यासाठी विविध राज्य सरकारसोबत सध्या चर्चा सुरु आहे. शेतकऱ्यांवर हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ येऊ नये, यासाठी प्रामुख्याने ही योजना असेल. काय आहे बाजार हमीभाव योजना? या योजनेनुसार जे दर जाहीर करण्यात आले आहेत, त्या दराने सर्व प्रकारचा शेतमाल खरेदी करण्याची राज्य सरकारला परवानगी असेल. फक्त यामध्ये भात आणि गहू पिकाचा समावेश नसेल, कारण हे दोन्ही शेतमाल केंद्र सरकारकडून अगोदरपासूनच सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी खरेदी केले जातात. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या धान्याचं काही नुकसान झाल्यास केंद्र सरकार त्याची 30 टक्के नुकसान भरपाई देईल. नव्या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतमालाच्या कापणीनंतर आवक वाढून दर घसरण्याचा जो धोका असतो, तो कमी होईल. गेल्या दोन वर्षांपासून पावसाने फिरवलेली पाठ आणि दुष्काळामुळे ग्रामीण भागावर मोठा परिणाम झाला आहे. त्यातून सावरण्यासाठी केंद्र सरकारची ही योजना असेल. गुजरात निवडणुकीनंतर नवी योजना? ही योजना यशस्वी झाल्यास एनडीएला त्याचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोठा फायदा होईल, असं जाणकारांना वाटतं. शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने ग्रामीण भागात सरकारवर मोठी नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यास मोठी मदत होईल. गुजरात निवडणुकीतही ग्रामीण भागाची सरकारवर नाराजी असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर सरकारने तातडीने पाऊल उचलत या योजनेचं नियोजन केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??
मोदी सरकारमधून या 6 मंत्र्यांची उचलबांगडी होणार? श्रीकांत शिंदे, संजय दिना पाटलांसह 9 नवीन चेहरे, वादात अडकलेल्या धर्मेंद्र प्रधान आणि निर्मला सीतारामनांचा सुद्धा काय निर्णय झाला??
Shrikant Shinde Union Cabinet Reshuffle 2026: केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट, प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद जाणार? केंद्रात कुणाकुणाला लॉटरी, A टू Z माहिती
केंद्रीय मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट, प्रतापराव जाधवांचं मंत्रिपद जाणार?; केंद्रात कुणाकुणाला लॉटरी, A टू Z माहिती
अनेक अधिकारी म्हणतात की, मी सुद्धा RSS ची चड्डी घातलीय, भाजपच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल 
अनेक अधिकारी म्हणतात की, मी सुद्धा RSS ची चड्डी घातलीय, भाजपच्या मंत्र्याचं मोठं वक्तव्य, व्हिडीओ व्हायरल 

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? ABP Majha Special Report
Eknath Shinde Speech : शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात असताना घरात होते, आता वरात काढून फिरतायत
Ketan Agarwal Case Recreation : केतन प्रकरणाचं रिक्रएशन, काय काय घडलं? | ABP Majha Special Report
Baramati Ujni Flemingo | फ्लेमिंगो रुसले, पर्यटक आटले | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
आप्पा ड्रायव्हिंग सीटवर अन् बाजूला सतेज पाटलांच्या आघाडीतील अरुण नरके; खासदार धनंजय महाडिक म्हणाले, 'पुढील दोन दिवसांमध्येच आणखी...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जून 2026 | सोमवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जून 2026 | सोमवार 
Ketan Agrawal: सिया अन् चेतनला 5 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय झालं, सियाचे वकील म्हणाले, ही हत्या नाहीच
सिया अन् चेतनला 5 दिवसांची पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय झालं, सियाचे वकील म्हणाले, ही हत्या नाहीच
Ireland Head Coach Resign : आयर्लंडनं भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवला, पुढच्या 24 तासांच्या आत मुख्य प्रशिक्षकाचा तडकाफडकी राजीनामा, नेमकं काय घडलं?
आयर्लंडला भारतावर टी 20 मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मोठा धक्का, मुख्य प्रशिक्षकाचा राजीनामा
टेंडरविनाच लाखोंचं भंगार खासगी कंपनीच्या घशात, KDMC चा प्रताप, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अधिकाऱ्यांची सारवासारव
टेंडरविनाच लाखोंचं भंगार खासगी कंपनीच्या घशात, KDMC चा प्रताप, 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर अधिकाऱ्यांची सारवासारव
TET Paper Leak : टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार ; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
टीईटी परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार ; मंत्री दादा भुसे यांच्याकडून मोठी माहिती
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
दिल्लीत 2 बीएचके फ्लॅट खरेदी करण्यासाठी महिन्याचा 2 लाख पगार सुद्धा चिल्लर झाला! फ्लॅटची किंमत किती कोटींच्या घरात?
Crime : चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
चालत्या बाईकवर जावयाचा सासूवर हल्ला, हेल्मेट डोक्यात घालून संपवलं, हृदयविकाराचा बनाव रचला
Embed widget