एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देशातील विमानतळांची नावं बदलणार?
नवी दिल्ली: केंद्र सरकार देशातील विमानतळांची नावं बदलण्याच्या विचारात असून, या निर्णयानंतर विरोधकांकडून सरकारची चांगलीच कोंडी होऊ शकते. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत, त्यांनी देशातील सर्व विमानतळांची नावं बदलण्याचा प्रस्ताव असल्याचं सांगितलं आहे. तसेच सरकार यावर विचार करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना सिन्हा यांनी सांगितलं की, देशात सध्या 75 विमानतळ असून, त्यातील अनेकांची नावं ही महान राजकीय नेते आणि ऐतिहासिक महापुरुषांच्या स्मरणार्थ आहेत. त्यामुळे ही बदलण्या संदर्भात पडताळणी करण्यात येत असून, यातून मध्यम मार्ग काय काढता येऊ शकतो? याचा सरकार विचार करत आहे.
सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरण (एआयई) 125 विमानतळांवरील हवाई वाहतुकीचं व्यवस्थापन करतं. यामध्ये 18 आंतरराष्ट्रीय, तर 78 अंतर्देशीय विमानतळांचा समावेश आहे. याशिवाय 26 विमानतळ संरक्षण विभागाच्या म्हणजेच हवाई दलाच्या तसंच सात विमानतळ सीमाशुल्क विभागाच्या ताब्यात आहेत.
मुंबईच्या विमानतळाला युती सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव देण्यात आल आहे. तर नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं 1986 साली नामकरण करुन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्यात आलं. तर 1995 साली कोलकता विमानतळाचं नाव बदलून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नावं देण्यात आलं. तर हैदराबाद विमानतळाला सुरवातीपासूनच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं नावं देण्यात आलं आहे. तर बंगळुरु शहराची उभारणी करणारे केम्पे गौडा यांच्या नावे बंगळुरुचं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. सरकारच्या या निर्णयानंतर या सर्व विमानतळांची नावं बदलण्यात येऊ शकतात.
दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळाच्या नावात बदल करुन त्यामध्ये महाराज हे नाव समाविष्ट केलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने असा निर्णय घेतल्यास यावर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
सिंधुदुर्ग
निवडणूक
निवडणूक
Advertisement