एक्स्प्लोर

FasTag : आता फास्टॅगही बंद होणार? 'अशी' होणार टोलवसुली, संसदीय समितीची शिफारस

Fastag Toll collection : टोलवसुलीसाठी काही वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेले फास्टॅग आता इतिहासजमा होण्याची शक्यता आहे.

Fastag Toll Collection :  टोल नाक्यावरच्या वाहनांच्या रांगा कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं फास्टॅग आणला. मात्र आता फास्टॅगही इतिहासजमा करण्याचा निर्णय केंद्र सरकार घेऊ शकतो. परिवहन आणि पर्यटनसंदर्भातील संसदीय समितीच्या फास्टटॅग काढण्याची शिफारस केली आहे. फास्टॅगऐवजी जीपीएस यंत्रणेच्या मदतीनं थेट बँक अकाऊंटमधून टोलचे पैसे वसूल करण्याचा शिफारस करण्यात आली आहे. 

परिवहन आणि पर्यटनसंदर्भातल्या संसदेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष टी जी व्यंकटेश यांनी बुधवारी संसदेत एक अहवाल सादर केला आहे. फास्टॅगचं ऑनलाइन रिचार्ज करताना अनेकांना अडचणीचा सामना करावा लागतो, मात्र जीपीएस यंत्रणा कार्यन्वित झाल्यानंतर या समस्येतून वाहनधारकांची कायमची सुटका होईल. तसेच टोल नाका उभारण्यासाठी लागणारा खर्च देखील वाचेल असे संसदीय समितीने आपल्या अहवालात म्हटले आहे.

वेळ आणि इंधनाची बचत

जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने देशभरातील टोलनाक्यांवरील कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. वाहतूक कोंडी न झाल्याने इंधनाची बचत होईल. त्याशिवाय प्रवासाला कमी वेळ लागेल आणि वेळेत इच्छित ठिकाण गाठता येऊ शकेल असे संसदीय समितीने म्हटले आहे. 

सल्लागार कंपनी नियुक्त होणार

जीपीएस आधारीत टोल वसूल करण्यासाठी यंत्रणा विकसित करावी लागेल. जेणेकरून थेट वाहन चालकाच्या बँक खात्यातून टोल शुल्क वसूल केले जाईल. त्यामुळे वाहनातून फास्टटॅगची गरजच संपुष्टात येईल. जीपीएस आधारीत टोल शुल्क वसूल करण्याची यंत्रणा सुरू करण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे सरकारने म्हटले आहे. जीपीएसच्या आधारे टोल वसूल करण्याबाबत सल्लागार कंपनी रोडमॅप तयार करणार आहे. 

FAStag नेमकं काय आहे? त्याने काय सुविधा मिळते?

फास्टटॅग म्हणजे एक डिजिटल स्टिकर आहे. हे स्टिकर गाडीच्या समोरच्या काचेवर लावलं जातं. रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे RFID तंत्रज्ञानावर हे स्टिकर काम करतं. या टेक्नॉलीजीच्या मदतीने टोल नाक्यांवर लागलेले कॅमेरे स्टिकरवरील बारकोड स्कॅन करतात आणि FASTag खात्यातून टोलची रक्कम वजा होते.

रोख पैशांचे व्यवहार न करता टोल भरण्यासाठी या फास्टॅगचा वापर होतो. टोलचे पैसे देण्यासाठी वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याचीही गरज लागत नाही. त्यामुळे वाहनचालकांना वेळ वाचतो, इंधनाची बचत होते. 

दुप्पट टोल भरावा लागणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) टोल प्लाझावर वाहनांना फास्टॅगमधून टोल भरणे सक्तीचे केले होते. फास्टॅग नसणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो. अनेकदा फास्टॅगमधूनही टोलवसूल होत नसल्याच्याही तक्रारी समोर आल्या होत्या.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या : 

 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
Internet Ban : मोठी बातमी, मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा निर्णय
मध्य दिल्लीतील इंटरनेट 24 तासांसाठी बंद राहणार, सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
दुष्काळी परिस्थिती! सणासुदीच्या मुहूर्तावर ग्राहकांना मोठा फटका, डाळींच्या दरात मोठी वाढ, नेमकी किती झाली वाढ?
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम तुम्हाला माहित आहे का? क्रेडिट कार्डवर 500 तर कर्जावर 5000 रुपयांचा दंड, जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget