एक्स्प्लोर

Census 2027 : तब्बल 15 वर्षांनंतर देशभरात आजपासून जनगणनेचा प्रारंभ, दोन टप्प्यात जनगणना, द्यावी लागतील 'या' 33 प्रश्नांची उत्तरे, वाचा A to Z माहिती

Census 2027 News :  देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय प्रक्रियेपैकी एक प्रक्रिया म्हणजे जनगणना असल्याचं म्हंटलं जातं. अशातच आज पासून अर्थात 1 एप्रिलपासून देशात जनगणना करण्यास सुरुवात होणार आहे.

Census 2027 News :  देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय प्रक्रियेपैकी एक प्रक्रिया म्हणजे जनगणना असल्याचं म्हंटलं जातं. अशातच आज पासून अर्थात 1 एप्रिलपासून देशात जनगणना करण्यास सुरुवात होणार आहे. तब्बल 15 वर्षांनंतर देशात जनगणना होणार असून, ही प्रक्रिया आता डिजिटल पद्धतीने पार पडणार आहे. सोबतच हि जनगणना दोन टप्प्यांत पार पडणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात घरगुती आणि गृहनिर्माण माहिती गोळा केली जाईल. १ एप्रिलपासून नागरिकांना स्वयं-नोंदणीची सुविधा उपलब्ध होईल, तर 16 एप्रिलपासून अधिकारी घराघरात जाऊन माहिती संकलन करतील. घराची स्थिती, पाणी, वीज, स्वच्छता आणि मालमत्ता यांची माहिती यामध्ये घेतली जाणार आहे.

Census 2027 : देशात तब्बल 15 वर्षांनंतर जनगणना होणार, दोन टप्प्यांत पार पडणार

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची सविस्तर माहिती नोंदवली जाईल. यामध्ये वय, शिक्षण, व्यवसाय, स्थलांतर यासह जातीनिहाय माहिती देखील गोळा केली जाणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2026 दरम्यान पहिला टप्पा पार पडणार असून, देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, 6.3 लाखांहून अधिक गावे यांचा ही समावेश असेल. सोबतच लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्यांना विवाहित मानले जाणार असल्याचा मोठा निर्णय देखील या संदर्भात घेण्यात आलाहे. एकूण 33 प्रश्न यंदा जनगणनेसाठी निच्छित केले आहे. दरम्यान हे प्रश्न नेमके कोणते हे आपण समजून घेऊ.

जनगणनेदरम्यान विचारले जाणारे 33 प्रश्न (33 Questions will be asked during janganana)

  • घराचा क्रमांक काय आहे?
  • कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक
  • कुटुंबप्रमुखाचे लिंग काय आहे?
  • जात कोणती आहे: सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर मागासवर्गीय (OBC)?
  • कुटुंबात किती सदस्य आहेत?
  • कुटुंबप्रमुखाचे नाव काय आहे?
  • विवाहित जोडप्यांची संख्या किती आहे?
  • घराची मालकी कोणत्या स्थितीत आहे?
  • घरात किती खोल्या आहेत?
  • शौचालय आहे का?
  • शौचालयाचा प्रकार कोणता आहे?
  • सांडपाणी निचरा व्यवस्था आहे का?
  • पिण्याच्या पाण्याचा स्रोत कोणता आहे?
  • विजेचा स्रोत कोणता आहे?
  • बाथरूम आहे का?
  • घरात गॅस कनेक्शन आहे का?
  • घरात टीव्ही आहे का?
  • इंटरनेटची सोय आहे का?
  • घरात रेडिओ किंवा ट्रान्झिस्टर आहे का?
  • स्वयंपाकासाठी मुख्य इंधन कोणते आहे? तुमच्याकडे लॅपटॉप किंवा संगणक आहे का?
  • खालीलपैकी टेलिफोन, मोबाईल फोन किंवा स्मार्टफोन कोणता आहे?
  • तुमच्याकडे सायकल, स्कूटर किंवा मोटरसायकल आहे का?
  • तुमच्याकडे कोणती कार, जीप किंवा व्हॅन आहे?
  • तुमचे मुख्य अन्न कोणते आहे?
  • तुमचा इमारत क्रमांक किंवा जनगणना क्रमांक काय आहे?
  • घराचा वापर
  • घराची स्थिती
  • घराच्या फरशीसाठी वापरलेले मुख्य साहित्य कोणते. म्हणजेच, फरशी सिमेंट, ग्रॅनाइट किंवा मार्बलची आहे का?
  • घराच्या भिंतींमध्ये कोणते साहित्य वापरले आहे?
  • घराच्या छतामध्ये कोणते साहित्य वापरले आहे?

कुटुंबप्रमुख या प्रश्नांची उत्तरे गणकाला देतील. गणक ही माहिती सुरक्षितपणे संग्रहित करेल. ही संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने पूर्ण केली जाईल. कुटुंबप्रमुखाची माहिती ऑनलाइन देखील गोळा केली जाईल.

जनगणनेचं महत्त्व

जनगणनेतून जी माहिती उपलब्ध होईल ती धोरण ठरवण्यासाठी आणि सार्वजनिक प्रशासनासाठी फायदेशीर होईल. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज संस्थांच्या मतदारसंघांच्या फेररचनेसाठी आणि आरक्षण निश्चितीसाठी जनगणनेच्या डेटाचा वापर होईल. संशोधकांना देखील या माहितीचा फायदा होईल. 

हे सुद्धा वाचा:

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget