CDS Bipin Rawat Death: तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या पार्थिव देहावर आज शुक्रवारी 10 डिसेंबर रोजी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. जनरल जनरल रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचं पार्थिव काल मिलिट्री विमानानं दिल्लीला आणलं गेलं. शुक्रवारी जनरल रावत यांचं पार्थिव दर्शनासाठी ठेवलं जाईल. सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांच्या पार्थिवाला सलामी देण्यासाठी ठेवलं जाईल. त्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी केली जाणार आहे. दिल्लीच्या कॅन्टॉन्मेंटमधील ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील.
काल तामिळनाडूतून 13 जणांचं पार्थिव दिल्लीतल्या पालमपूरमध्ये आणण्यात आलं. यावेळी निधन झालेल्या 13 जणांचं कुटुंब उपस्थित होते. कुटुंबियांनी श्रद्धांजली वाहिल्यानंतर पंतप्रधान मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आदरांजली अर्पण केली. शिवाय तिन्ही दलाच्या प्रमुखांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
कोण होते सीडीएस जनरल बिपीन रावत?
- 2016 साली बिपीन रावत हे लष्करप्रमुख झाले. लष्करप्रमुख दलबीरसिंह सुहाग 31 डिसेंबर 2016ला सेवानिवृत्त झाले होते, त्यांच्या जागी रावत यांची नेमणूक करण्यात आली होती.
- बिपीन रावत हे मूळचे उत्तराखंडचे आहेत. त्यांची 1 सप्टेंबर 2016 रोजीच सेनेच्या उपप्रमुखपदी नियुक्ती झाली होती.
- बिपीन रावत यांचे वडिलही नि. लेफ्टनंट जनरल एल एस रावत हे सेनेच्या उपप्रमुखपदावर निवृत्त झाले होते.
- रावत हे डिसेंबर 1978 मध्ये भारतीय सैन्य अकादमीतून पासआऊट झालेले 'बेस्ट कॅडेट' ठरले.
- रावत यांना 'स्वार्ड ऑफ ऑनर' या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं.
- सेवा मेडल, युद्ध सेवा मेडल, सेना मेडल आणि विशिष्ट सेवा मेडल सारख्या अनेक पुरस्कारांनी रावत यांना गौरवण्यात आलं आहे.
CDS General Bipin Rawat यांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून श्रद्धांजली : Rajnath Singh
इतर महत्त्वाच्या बातम्या :