CBSE, ICSE 12th Exam SC Hearing: सीबीएसई, आयसीएसई 12 वीची परीक्षा रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाकडून 31 मेपर्यंत तहकूब
CBSE, ICSE 12th Exam SC Hearing: कोरोनाव्हायरस प्रकरणांची वाढती संख्या लक्षात घेता सीबीएसई (CBSE) आणि आयसीएसईच्या (ICSE) 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका पुढे ढकलण्यात आली आहे. आता या याचिकेवर 31 मे 2021 रोजी सोमवारी सुनावणी होईल.
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनसाठी (CISCE) सीबीएसई, आयसीएसई बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी दाखल याचिका 31 मेपर्यंत तहकूब केली आहे. सीबीएसई आणि आयसीएसईच्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सोमवारी 31 मे 2021 रोजी सुनावणी होईल. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या साथीच्या दरम्यान बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी केली.
सर्वोच्च न्यायालयात अॅडव्होकेट ममता शर्मा यांची याचिका
सर्वोच्च न्यायालयाच्या अॅडव्होकेट ममता शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत केंद्र, माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा (सीआयएससीई) परिषदेला सीबीएसई आणि आयसीएसई इयत्ता 12 वीच्या परीक्षा रद्द करण्यास सांगितले आहे. या याचिकेत वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली आहे की राष्ट्रीय परीक्षा घेणाऱ्या अधिकाऱ्यांना विशिष्ट कालावधीत वस्तुनिष्ठ पद्धतीच्या आधारे 12 वीचा निकाल जाहीर करावा.
300 विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीशांना लिहिले पत्र
त्याचबरोबर, 300 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी फिजिकली परिक्षा रद्द करण्यासाठी आणि गेल्यावर्षीप्रमाणे पर्यायी मूल्यांकन योजना उपलब्ध करुन देण्यासाठी सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांना पत्र लिहिले आहे. एमओईच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, "आतापर्यंत मिळालेल्या अभिप्रायाच्या आधारे परीक्षा घेण्यात यावी याविषयी सर्वसाधारण एकमत आहे." शिक्षणमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे बारावीच्या परीक्षेसंदर्भातील अंतिम निर्णय 1 जूनपर्यंत जाहीर करण्यात येईल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI