CBSE 2021 Exam Schedule | सीबीएसई 10 वी 12 वी बोर्डाचे वेळापत्रक 'या' दिवशी जाहीर होणार
सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. आता शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी या विषयी माहिती दिली आहे.
नवी दिल्ली : सीबीएसई 10वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा 31 डिसेंबरला जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मार्च महिन्यात सुरु झाले. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरही परिणाम झाला. त्यामुळे सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाचे पेपर नेमके कधी होणार? याबाबत विद्यार्थ्याना प्रश्न पडला होता. मात्र यावर शिक्षणमंत्री पोखरीयाल यांनी 31 डिसेंबरला याबाबतच वेळापत्रक जाहीर करणार असल्याचं सांगितलं आहे.
देशभरातील शिक्षकांशी ऑनलाईन शिक्षकांशी संवाद साधला होता. त्यावेळी पोखरीयाल यांनी सीबीएसई 10 वी आणि 12 बोर्डाच्या परीक्षा जानेवारी-फेब्रुवारीमध्ये परीक्षा घेणे शक्य नाही, असे स्पष्ट केले होते. सीबीएसईने कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षांचा 30 टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. बोर्डाने गुणपत्रिकेवरून 'नापास' हा शब्दही हटवला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा लेखी स्वरुपात असतील परंतु यावेळी कोविडच्या सर्व मार्गदर्शक सूचना योग्य पद्धतीने पाळल्या जातील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत कोणताही हलगर्जीपणा केला जाणार नाही. सन 2021 साठीच्या बोर्ड परीक्षा ऑनलाइन नसून लेखी स्वरुपाच्या असणार आहेत. ऑनलाईन परीक्षांची एक समस्या अशी आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे ऑनलाइन परीक्षा देण्याचे साधन नसते. यामुळे बोर्डही ऑनलाईन परीक्षेचा विचार करत नाही.