एक्स्प्लोर
Advertisement
CBI आणि ED नीरव मोदी-मेहुल चोक्सीकडून पैसा कसा वसूल करणार?
नीरव मोदीच्या धमकीनंतर आता साडे अकरा हजार कोटींची वसुली होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
नवी दिल्ली : नीरव मोदीच्या कर्ज परत न करण्याच्या धमकीनंतर तपास यंत्रणांनी त्याच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेची यादी बनवणं सुरु केलं आहे. लवकरच ही संपत्ती जप्त करण्याचीही तयारी केली आहे. मात्र नीरव मोदीच्या धमकीनंतर आता साडे अकरा हजार कोटींची वसुली होईल का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
पीएनबीने आपल्या कंपन्यांवर असलेलं कर्ज वाढवून सांगितलं असल्याचा दावा नीरव मोदीने केला आहे. पीएनबीला 15-16 फेब्रुवारीला नीरव मोदीकडून पत्र लिहिण्यात आलं. ज्यात, आपल्या कंपन्यांवर पीएनबीचं कर्ज 5 हजार कोटींपेक्षा कमी आहे, असाही दावा नीरव मोदीने केला आहे.
'पीटीआय'ने नीरव मोदीच्या पत्राबाबत वृत्त दिलं आहे. ''चुकीच्या पद्धतीने कर्जाची आकडेवारी सांगितल्यामुळे माध्यमांमध्ये हे प्रकरण गेलं आणि चौकशी सुरु झाली. परिणामी कामही बंद झालं. प्रकरण सार्वजनिक झाल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला आहे. आता बँकेचं कर्ज चुकतं करण्याची आमची क्षमताही धोक्यात आली आहे,'' असं नीरव मोदीने म्हटलं आहे.
पीएनबीने प्रकरण सार्वजनिक केल्याने देणं देऊ शकत नाही : नीरव मोदी
नीरव मोदी बँकेचे पैसे परत करण्याच्या मूडमध्ये नसल्याचं या पत्रातून स्पष्टपणे दिसतं. सूत्रांच्या माहितीनुसार, आयकर विभाग, सीबीआय आणि ईडीने बँक प्रशासनाच्या सहकार्याने पैसा वसूल करण्याचं धोरण आखलं आहे. तपास यंत्रणांनी बँकेकडून नीरव मोदीच्या संपत्तीची यादी मागवली आहे, जेणेकरुन संपत्ती जप्त करता येईल. नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीची आतापर्यंत 6 हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये मेहुल चोक्सीची 4 हजार कोटी आणि नीरव मोदीच्या 1500 कोटींपेक्षा अधिक संपत्तीचा समावेश आहे. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांचा देशात एकूण किती व्यवसाय आहे, याचं सध्या आकलन केलं जात आहे, ज्याची यादीही तयार करण्याचं काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांची स्थावर मालमत्ता एवढी आहे, की घोटाळ्यातील रक्कम सहज वसूल करता येईल. त्यामुळे संपत्ती जप्त करुन घोटाळ्याची रक्कम वसूल करता येईल का, असा प्रश्न आहे. संबंधित बातम्या : पीएनबी घोटाळा : छोटे मासे गळाला, 3 आरोपींना 14 दिवसांची CBI कोठडी PNB चा तत्कालीन शाखा उपव्यवस्थापक गोकुळनाथसह तिघांना अटक PNB घोटाळा : 5 हजार कोटींचा गैरव्यवहार एनडीएच्या काळात PNB घोटाळा : नीरव मोदी, मेहुल चोक्सीचे पासपोर्ट रद्द पीएनबी घोटाळा : अकरा हजार कोटी परत कसे मिळणार? PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय? PNB ला 11 हजार कोटींना गंडवणारे नीरव मोदी देशाबाहेर पळाले पीएनबी घोटाळा : डायमंड किंग नीरव मोदीवर गुन्हा दाखलअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रीडा
मुंबई
Advertisement