एक्स्प्लोर
Advertisement
विजय मल्ल्या कर्ज प्रकरण : सीबीआयचं अटकसत्र, बडे मासे जाळ्यात
बंगळुरु : फरार उद्योगपती विजय मल्ल्याच्या बुडीत कर्ज प्रकरणात सीबीआयने अटकसत्र सुरु केले आहे. सीबीआयने आतापर्यंत 9 जणांना अटक केली आहे. बंगळुरुतील एकूण 11 ठिकाणी सीबीआयने छापे टाकून ही कारवाई केली.
किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर 6 हजार 203 कोटी रुपयांचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे.
यामध्ये आयडीबीआय बँकेचे माजी अध्यक्ष योगेश अग्रवाल आणि किंगफिशरचे मुख्य वित्तीय अधिकारी ए. रघुनाथन या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच आयडीबीआयचे तीन आणि किंगफिशरच्या तीन कमर्चाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं मल्या यांच्या मालकीच्या यूबी समूहाच्या बंगळुरूतील कार्यालयावर धाड टाकून तेथील कागदपत्रे तपासली. नियम डावलून गैरमार्गाने कर्ज मंजुर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement