नवी दिल्ली : नागरिकत्व दुरूस्ती कायद्या (CAA) विरोधात देशभरात आंदोलनं सुरू असताना NPR म्हणजेच, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर वरून विरोध पक्षांनी केंद्र सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. एकीकडे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी, NPR गरिबांवर आकारण्यात आलेला टॅक्स आहे असं म्हणाले, तर एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसीही NPR म्हणजे, NRC ची पहिली पायरी असल्याचे म्हणाले आहेत. दुसरीकडे केंद्र सरकार मात्र नागरिकत्व दुरूस्ती कायद्यामुळे कोणाचंही नागरिकत्व धोक्यात येणार नाही, असं सतत सांगताना दिसत आहे.


याच मुद्यावरून शुक्रवारी हिमाचल प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधी यांना आव्हान देत म्हटलं आहे की, सिद्ध करून दाखवा NRC मुळे एखाद्याचं नागरिकत्व कसं धोक्यात येणार आहे. काँग्रेस अॅन्ड कंपनी सतत अफवा पसरवत आहेत की, CAA मुळे अल्पसंख्यकांचं नागरिकत्व धोक्यात येणार आहे. मी राहुल बाबांना आव्हान करतो की, त्यांनी या कायद्यामध्ये कुठेही एकाही व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असल्याचं दाखवावं. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेस काळात तर आलिया, मालिया, जमालिया कोणालाही खेचून आणलं जातं असे.

पाहा व्हिडीओ : CAA, NRC आणि NPR च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुलाखत



दरम्यान, हिमाचल प्रदेश सरकारने आपल्या कार्यकाळाचे दोन वर्ष पूर्ण केले आहेत. याचनिमित्ताने शिमलामधील ऐतिहासिक रिज मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपच्या कार्यकारी अध्यक्षांसमवेत हिमाचल प्रदेशमधील सर्व भाजप नेते उपस्थित होते. त्यावेळी घेतलेल्या सभेमध्ये अमित शहा बोलत होते.

शेतकरी, कामगार, गोरगरीब, आदिवासी देशाची अर्थव्यवस्था चालवतात : राहुल गांधी

राहुल गांधी म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था शेतकरी, कामगार, गोरगरीब, आदिवासी चालवतात. परंतु हे सरकार काही ठरावीक लोकांसोबत देशाची अर्थव्यवस्था चालवत आहेत. जर देशाचा सर्व पैसा 10-15 लोकांच्या ताब्यात दिला, नोटबंदी केली, चुकीच्या पद्धीने जीएसटी लागू केला, रोजगार निर्माण केले नाहीत तर देशाची अर्थव्यवस्था चालूच शकत नाही.


सध्या केंद्रात 'टुकडे-टुकडे गँग' सत्तेत : तुषार गांधी

नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्यापासून त्याविरोधात दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशाच्या अनेक भागांमध्ये आंदोलनं होत आहेत. देशभरातून केंद्र सरकारवर टीका सुरु आहे. आता त्यामध्ये महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांची भर पडली आहे. तुषार गांधी यांनी ट्वीट करुन केंद्र सरकारवरील नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, सध्या केंद्रात 'टुकडे-टुकडे गँग' सत्तेत आहे.

संबंधित बातम्या :

NRC | एनआरसीच्या मुद्द्यावर भाजप एकटी पडत चाललीय का? मित्रपक्षांच्या भूमिकांनी मोदी सरकार बॅकफूटवर

राहुल गांधींना 'लायर ऑफ इ द ईयर' पुरस्काराने गौरवण्यात यावं; प्रकाश जावडेकरांची राहुल गांधींवर टीका

भावा-भावांमध्ये भांडणं लावून विकास होणार नाही; राहुल गांधींचा मोदींवर हल्ला

देशावर तुकडे तुकडे गँगची सत्ता; तुषार गांधींचा मोदी-शाहांना टोला

CAA : दिल्लीतल्या हिंसाचारामागे काँग्रेसची तुकडे-तुकडे गँग; अमित शाहांचा आरोप