एक्स्प्लोर

छातीपर्यंत पाण्यात मातृभूमीचं रक्षण, बीएसएफ जवानांना सलाम

हे फोटो पाहून आपल्या जवानांबद्दलचा आदर आणखीच वाढेल. पुरामध्ये चार ते पाच फुटांपर्यंतच्या पाण्यात हे जवान आपल्या मातृभूमीचं रक्षण करत आहेत.

नवी दिल्ली : ऊन, वारा, पाऊस... कशाचीही तमा न करता आपले सैनिक सीमेवर कसा खडा पहारा देत आहेत, याचे फोटो सीमा सुरक्षा दलाने जारी केले आहेत. हे फोटो पाहून आपल्या जवानांबद्दलचा आदर आणखीच वाढेल. पुरामध्ये चार ते पाच फुटांपर्यंतच्या पाण्यात हे जवान आपल्या मातृभूमीचं रक्षण करत आहेत. देशाच्या अनेक राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. बिहार, आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारमधील अररिया आणि सुपौल हे जिल्ह्यात पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती बिकट बनली आहे. अशा अनेक परिसरात पाच फुटांपर्यंत पाणी भरलं आहे. परंतु अशा कठीण स्थितीतही पेट्रोलिंग करणाऱ्या बीएसएफ जवानांचे काही फोटो समोर आले आहेत. छातीपर्यंत पाण्यात मातृभूमीचं रक्षण, बीएसएफ जवानांना सलाम बीएसएफने आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात छातीपर्यंत पाण्यातही बीएसएफ जवान सीमेवर खडा पहारा देत आहेत. 'बॉर्डरवर आणखी एक दिवस,' असं बीएसएफने फोटो शेअर करताना लिहिलं आहे. https://twitter.com/BSF_India/status/896392637145423872 बीएसएफ जवानांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावर अनेक ट्विटराईट्सनी प्रतिक्रियाही दिली आहे. 'बीएसएफ जवान खरे भारताचे हिरो आहेत,' असं एका युझरने लिहिलं आहे. तर 'तुम्ही अशाप्रकारे देशाची सेवा करता आणि मंत्री तसंच देशातील लोक एसीमध्ये राहतात, याची मला लाज वाटते,' असं ट्वीट आणखी एका युझरने केलं आहे. छातीपर्यंत पाण्यात मातृभूमीचं रक्षण, बीएसएफ जवानांना सलाम सुरक्षेच्या कारणात्सव हे फोटो नेमके कुठले आहेत, याबाबत बीएसएफने काहीही स्पष्ट केलेलं नाही. पण पाण्यात राहून अशा परिसरात पहारा देणं अतिशय आव्हानात्मक असतं. यामुळे जवानांची तब्येत बिघडू शकते. शिवाय साप, विंचू चावण्याचाही धोका असतो.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Gujarat Speech : सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
सुन रहे हो न विनोद! आपलं लक्ष्य साधंसुधं नसतं, पुतळा बनवला तो पण जगातील सर्वात मोठा; नरेंद्र मोदींचे भाषण व्हायरल
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Shield Multi Cancer Detection: फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती
फक्त एका ब्लड टेस्टने होणार 10 प्रकारच्या कॅन्सरचे निदान? भारतात क्रांतिकारी चाचणी लाँच, जाणून घ्या A टू Z माहिती

व्हिडीओ

Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report
Mumbai Rain Tree Fall | मुंबईच्या रस्त्यांवर मृत्यूच्या झाडांचं 'जाळं' | ABP Majha Special Report
Dr. Budhajirao Mulik On Majha Katta :शेतकरी राजा कधी होईल? कृषितज्ज्ञ बुधाजीराव मुळीक माझा कट्ट्यावर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mutual Fund : गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
गेल्या एका वर्षातील सर्वोत्तम कामगिरी कोणत्या म्युच्युअल फंड्सनं केली, जाणून घ्या यादी
Raigad Palghar Rain Alert : रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
रायगड आणि पालघरमध्ये पावसाचा 'रेड अलर्ट', सोमवारी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर!
Ram Mandir: राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
राम मंदिरातील राजरोस लूट समोर आली, 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'ला RTI अंतर्गत आणा, खासदाराचे थेट अमित शाहांना पत्र
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांची पाच दिवसात 1 लाख कोटींची कमाई, भारती एअरटेलला सर्वाधिक फायदा तर एल अँड टी आणि रिलायन्सला फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 6 कंपन्यांचे गुंतवणकदार मालामाल, 1 लाख कोटींची कमाई, चार कंपन्यांना फटका
Ayatollah Ali Khamenei: इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
इराणचे सर्वोच्च धर्मगुरु अयातुल्ला खामेनींना शेवटचा निरोप देण्यासाठी कोट्यवधी देशवासी जनता फक्त काळ्या रंगाच्या पोशाखातच का पोहोचली?
Bhiwandi Rain : भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
भिवंडीत पावसात पालिका गायब, मदतीला 'स्पायडरमॅन' हजर! जलमय रस्त्यांवर उतरून नागरिकांना दिला आधार
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
'तर तुम्हाला मला मारावं लागेल, गद्दारीला सुद्धा मर्यादा असते, जर तुमच्यात हिंमत असेल..' फुटीर आमदार खासदारांना ममता बॅनर्जींचे ओपन चॅलेंज!
Nashik Crime News: कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
कट लागल्याचा जाब विचारताच कारचालकाचा संताप अनावर, दुचाकीस्वाराला भर रस्त्यात भोसकलं, नंतर पोलिसांनाही चिरडण्याचा प्रयत्न; नाशिकमधील धक्कादायक घटना
Embed widget