Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्तीगीर महासंघांचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. लैंगिक छळ केल्याप्रकरणी  महिला कुस्तीपटूंकडून न्यायालयात धाव घेण्यात आली होती. आता दिल्ली न्यायालयाने लैंगिक छळ, महिलांचे ब्लॅकमेलिंग अशा अनेक आरोपांची न्यायालयाकडून निश्चिती करण्यात आली आहे. ब्रिजभूषण सिंहांनी न्यायाधीश प्रियांका राजपूत यांच्यासमोर मी निर्दोष असल्याचे म्हटले आहे. 


दरम्यान, न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांनी बृजभूषण यांना प्रश्न विचारले. तुम्ही म्हणाला होतात की, आरोप निश्चित झाले तर, मी फासावर लटकेल, असा प्रश्न पत्रकाराने विचारला. यावर उत्तर देताना ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले, रात्री या फासावर लटकतो. तुम्ही काहीही विनोद करत आहात. मी म्हटलो होतो आरोप सिद्ध झाले तर फासावर लटकेन. आता माझ्यावर आरोप निश्चित झाले आहेत. त्यांना न्यायालयात आरोप सिद्ध करायचे आहेत. माझ्याकडे मी निर्दोष असल्याचे पुरावे आहेत. न्यायालयाची एक प्रोसेस असते, त्याप्रमाणे आपण गेले पाहिजे. 






मी काहीच गुन्हा केलेला नाही, तर गुन्ह्यांची कबुली कशामुळे देऊ?


मी काहीच गुन्हा केलेला नाही, तर गुन्ह्यांची कबुली कशामुळे देऊ? असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले आहेत. न्यायालयात  सहआरोपी असलेल्या सचिन तोमर यांच्याविरोधातही धमकी दिल्याप्रकरणी आरोप निश्चिती करण्यात आली आहे. तोमर यांनीही मी निर्दोष असल्याचे म्हणत आरोप फेटाळले आहेत. मी कोणत्याही महिला कुस्तीपटूला घरी बोलावलेले नाही आणि घरी देखील बोलावलेले नाही, असं सचिन तोमर यांनी म्हटलंय. 


भाजपने लोकसभेचं तिकीट कापलं 


महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केलेल्या बृजभूषण सिंह (BrujBhushan singh) यांचे तिकीट भाजपकडून कापण्यात आले होते. कैसरगंज लोकसभा (Loksabha) मतदारसंघातून बृजभूषण सिंह निवडून आले होते. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले. भाजपच्या स्थानिक निवड समितीकडून येथील जागेसाठी बृजभूषणसिंह यांचंच नाव देण्यात आलं होतं. मात्र, भाजपच्या (BJP) वरिष्ठ निवड समितीने खासदार सिंह यांचं तिकीट कापून त्यांच्याजागी त्यांचे सुपुत्र करण शरणसिंह यांना तिकीट दिलं होतं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


भाजपचा बृजभूषण सिंहांना दे धक्का, लोकसभेचं तिकीट कापलं, पण...; कैसरगंजमधून कुणाला उतरवलं