Success Story: अलिकडच्या काळात महिला (women) देखील पुरुषांच्या बरोबरीनं काम करत असल्याचे दिसून येते. सर्वच क्षेत्रात आज महिला चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसत आहेत. आज आपण अशाच एका जिद्दी महिलेची यशोगाथा (Success Story) पाहणार आहोत. या महिलेनं प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत मोठा व्यवसाय उभा केला आहे. फक्त 25000 रुपयांचे भांडवल गुंतवूण या महिलेनं झाडू व्यवसाय सुरु केला होता. दीड वर्षातच महिलेनं 12 लाख रुपये कमावले आहेत. सोनिका (Sonika) असं मेरठच्या (Meerut) राली चौहान गावातील महिलेचं नाव आहे. 

Continues below advertisement


सुरुवातीला कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण  


सोनिका यांनी फक्त 25 हजार रुपयांपासून व्यवसायाची सुरुवात केली होती. अवघ्या दीड वर्षात त्यांचा व्यवसाय हा 12 लाख रुपयांचा झाला आहे. सोनिकाचा यांचे पती घरांना रंगकाम करायचे. त्यामुळे उत्पन्न कमी होते. कधी काम मिळाले, कधी नाही. कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण होत होते. यानंतर सोनिका यांनी झाडू बनवायचा व्यवसाय सुरु केला. त्यांनी घरीच झाडू बनवायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या मेहनतीला फळ आले आणि त्यांनी बनवलेल्या झाडूची मागणी वाढू लागली. झाडू व्यवसायाने त्यांची गरिबी दूर केली. 


25 हजार रुपये कर्ज घेऊन झाडू व्यवसाय सुरु केला


सुरुवातीला सोनिका यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटांनी घेरले होते. पती फारसे कमावत नव्हते. या पैशातून मुलांना शिक्षण देणे आणि घर चालवणे हे सोनिकासाठी आव्हानात्मक काम होते. घरच्यांच्या संमतीने त्यांनी जेल चुंगी येथील कॅनरा आरएसईटीआय येथून झाडू बनवण्याचे 6 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतरच सोनिका यांनी 25 हजार रुपये कर्ज घेऊन झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. सोनिकांनी बनवलेले झाडू दुकानदारांना खूप आवडले. तो त्या विकत घेऊ लागला. ऑर्डर्स वाढू लागल्यावर सोनिकाने तिचा नवरा आणि गावातील काही महिलांनाही सोबत घेतले. आज अनेक महिला सोनिकासोबत काम करून स्वावलंबी झाल्या आहेत. लोकांनी सोनिका आणि तिच्या कुटुंबाची अनेकदा चेष्टा केली. पण, सोनिकाने कधीही हार मानली नाही आणि तिची हिंमत कायम ठेवली.


सोनिका प्रशिक्षित महिलांना रोज 800 ते 1000 रुपयांचा रोजगार देते


पूर्वी सोनिका झाडू घेऊन बाजारात जात असे, आज ती ट्रकने मालाचा पुरवठा करते. त्यांचे झाडूही दिल्लीत विकले जातात. सोनिकाचा नवरा आता मार्केटिंगचे काम पाहतो. सध्या सर्व खर्च आणि मजुरी करुन सोनिका जवळपास 50 हजार रुपये वाचवते. त्यांची उलाढाल 10 ते 12 लाखांच्या आसपास पोहोचली आहे. सोनिका प्रशिक्षित महिलांना रोज 800 ते 1000 रुपये देते. त्याचबरोबर अप्रशिक्षित महिला व मुलींना चारशे ते पाचशे रुपये मिळतात.


मेरठच्या आसपासच्या परिसरामध्ये प्रशिक्षण देण्याचे काम


दरम्यान, सोनिका या मेरठच्या आसपासच्या परिसरामध्ये प्रशिक्षण देण्याचे काम करतात. त्या गावातील महिला आणि तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. कठोर परिश्रम आणि समर्पणाने काहीही साध्य करता येते हे त्यांच्याकडून शिकता येते. सोनिका यांच्या यशाचे मुख्य कारण म्हणजे त्यांची मेहनत, समर्पण आणि ग्राहकांच्या गरजा समजून घेणे होते. 


महत्वाच्या बातम्या:


2 कोटी रुपयांची नोकरी सोडून सुरु केलं स्टार्टअप, कशी मिळाली आयुष्याला कलाटणी? तरुण उद्योजकाची यशोगाथा