Gold Silver Price News : सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशांतर्गत बाजारत आजा सोन्या चांदीच्या दरात चांगलीच घट झाल्याचे दिसून आले. यामुळं ग्राहकांच्या खिशाला लागणारी कात्रा कमी झाली आहे. सोन्याबरोबरच चांदीच्या दरात (Silver Rate) तर तब्बल 1900 रुपयांची घसरण झालीय. एमसीएक्सवर हे दर देण्यात आले आहेत.
चांदी 1900 तर सोनं 500 रुपयांनी स्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार आज बाजार उघडताच एमसीएक्सवर चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज चांदीच्या दरात 1900 रुपयांची घसरण झालीय. चांदीसोबतच आज सोनंही 500 रुपयांनी स्वस्त झालं आहे. सध्या सोने 73,800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे. आज चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली आहे. कालच्या तुलनेत चांदी 1867 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या चांदी 93,400 रुपये किलोवर पोहोचली आहे. याआधी वायदा बाजारात चांदीचा भाव 95,267 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती.
एमसीएक्सवर सोने 560 रुपयांनी स्वस्त
मिळालेल्या माहितीनुसार आज एमसीएक्स फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीसोबत सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली. एमसीएक्सवर सोने 560 रुपयांनी स्वस्त झाले असून त्याची किंमत 73,807 रुपये आहे. आदल्या व्यवहाराच्या दिवशी वायदा बाजारात सोने 74,367 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झालीय. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या हंगामात सोन्या चांजीटी मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते.
प्रमुख 10 शहरांमधील सोन्या-चांदीचे दर काय?
दिल्ली - 24 कॅरेट सोने 74,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम
मुंबई - 24 कॅरेट सोने 74,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो
कोलकाता - 24 कॅरेट सोने 74,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो
चेन्नई - 24 कॅरेट सोने 74,840 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 99,000 रुपये प्रति किलोग्रॅम
जयपूर - 24 कॅरेट सोने 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो
नोएडा - 24 कॅरेट सोने 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम
लखनौ - 24 कॅरेट सोने 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम
पाटणा - 24 कॅरेट सोने 74,560 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम
पुणे - 24 कॅरेट सोने 74,510 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलो
गुरुग्राम - 24 कॅरेट सोने 74,660 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 94,600 रुपये प्रति किलोग्रॅम
महत्वाच्या बातम्या:
सोने, चांदीचा भाव वधारला, चांदी लवकरच एक लाखाच्या पुढे? जाणून घ्या नेमका दर काय?