Breaking News LIVE | राज्यात आज 6397 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ

Breaking News LIVE Updates, 1 March 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Mar 2021 10:56 PM
राज्यात आज 6397 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 5754 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2030458 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 77618 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.94% झाले आहे.
राज्यात आज 6397 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून, आज नवीन 5754 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2030458 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 77618 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.94% झाले आहे अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर H 3/1 या कंपनीला दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये तीन कामगार भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत त्यांना नवी मुंबईच्या ऐरोली येथील बर्न हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आल आहे

गणेश मोकणार 33,कुबेर मदनापूर 33 आणि धृप पांडे 35 अशी गंभीर जखमींची नावे आहेत
आग लागल्यानंतर तारापूर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तातडीने आग आटोक्यात आणली म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला
इंदापूर तालुक्यातून चोरीस गेलेले तब्बल 29 नवे फ्रीज परभणी पोलिसांनी जप्त केले आहेत. शहरातील वसमत रोड वरील भालेराव कॉम्प्लेक्समधून हे फ्रीज पोलिसांनी जप्त केले आहेत.

परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील भालेराव कॉम्प्लेक्समध्ये काही संशयास्पद वस्तू ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली, त्यावरून या पथकाने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता या कॉम्प्लेक्समधील एका रूममध्ये तब्बल 29 नवे फ्रिज असल्याची बाब पोलिसांच्या तपासणीत उघड झाली. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत रांजणगाव पुणे येथील कंपनीचे रजिस्ट्रेशन असलेले हे नवे फ्रीज इंदापूर येथून चोरी गेलेले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या फ्रीज चोरीचा गुन्हाही इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर 29 फ्रीज जप्त करून नवामोंढा पोलिस ठाण्यामध्ये ठेवले असून या प्रकरणात भेंडेकर नावाच्या व्यक्तीला ही अटक करण्यात आलेली आहे.
बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट नंबर H 3/1 या कंपनीला दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये तीन कामगार भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नवी मुंबईच्या ऐरोली येथील बर्न हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल आहे. गणेश मोकणार 33, कुबेर मदनापूर 33 आणि धृप पांडे 35 अशी गंभीर जखमींची नावे आहेत. आग लागल्यानंतर तारापूर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होऊन तातडीने आग आटोक्यात आणली म्हणून पुढील मोठा अनर्थ टळला.
आयसीएसई बोर्डाचे वेळापत्रक जाहीर, आयसीएसई 10 वी बोर्ड परीक्षा 5 मे ते 7 जून दरम्यान तर (आयएससी) 12 वी बोर्ड परीक्षा 8 एप्रिल ते 16 जून दरम्यान होणार. सविस्तर वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळवर अपलोड करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यात मागील काही दिवसात कोरोना रुगणाच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. यामुळे प्रशासनावर ताण वाढला आहे. त्यातच एका खासगी वसतिगृहातील 47 विद्यार्थी कोरोनाग्रस्त आढळून आले. दररोज कोरोना ग्रस्तांचा आकडा वाढू लागला आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू झाले आहे. लातूर सारख्या शैक्षणिक हब असलेल्या शहरात राज्यभरातून दरवर्षी 25 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. याच विद्यार्थी वसतिगृह, कॉलेज आणि कोचिंग क्लासमध्ये कोरोना चाचणी मनपाने अनिवार्य केली आहे. तसे पत्र मनपाने दिले आहे.
MMRDA आयुक्त आर ए राजीव यांना तीन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय,
28 फेब्रुवारी रोजी आर ए राजीव निवृत्त होणार होते पण सरकरने मुदतवाढ दिली, काही दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्रांकडे राजीव यांच्याविरुद्ध पत्र लिहिले होते, त्यांना मुदत वाढ देऊ नये ही मागणी केली होती, त्यांना मुदत वाढ म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेण्याचं प्रकार होईल असा उल्लेख पत्रात केला होता, बिल्डर आणि ठेकेदार यांच्याशी आर ए राजीव यांचे संगनमत असल्याचा आरोपही प्रताप सरनाईक यांनी केला होता, पण सरकारने तरीही त्यांना दिली मुदतवाढ
अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनारी तरुणाची आत्महत्या. कळव्यातील इसमाची किहीम समुद्रात आत्महत्या. कळवा येथील ३५ वर्षीय सुरेश म्हात्रे याने आत्महत्या केल्याचा संशय.
अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनारी तरुणाची आत्महत्या. कळव्यातील व्यक्तीची किहीम समुद्रात आत्महत्या. कळवा येथील 35 वर्षीय सुरेश म्हात्रे याने आत्महत्या केल्याचा संशय.
अमरावती जिल्ह्यात आज पुन्हा कोरोना रुग्णांत पुन्हा मोठी वाढ. आज दिवसभरात अमरावती जिल्ह्यात 699 कोरोना रुग्ण आढळले. आज 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 35 हजार 816 वर. लॉकडाऊनच्या सातव्या दिवशीही परिस्थीती जैसे थे
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मृत मुलीच्या कुटुंबाची बदनामी करून बंजारा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी वाशिमच्या मानोरा पोलिसात देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, अतुल भातकळकर, सुधीर मुंनगूनटीवार यांच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल.
चंद्रपूर : प्रेमी युगुलाची रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या, आकाश मेश्राम (22) आणि मयुरी कांबळे (17) अशी मृतकांची नावं, वरोरा शहरातील महाकाली नगरी जवळील रेल्वे रूळावरील घटना, मुलगा वर्धा जिल्ह्याचा तर मुलगी चंद्रपूरच्या भद्रावतीची, रेल्वेने दिली वरोरा पोलिसांना माहिती. पोलिसांनी दोन्ही मृतदेह पोस्टमोर्टमसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. वरोरा पोलिस याचा अधिक तपास करत आहेत.
रत्नागिरीच्या भागवती किल्ल्यावरून तरुणीचा खाली कोसळून मृत्यू. जवळपास 200 फूट खोल समुद्राच्या किनाऱ्यावर कोसळून मृत्यू. तरुणीचं वय अंदाज़े 22 वर्ष. अपघात कि घातपात हे अद्याप स्पष्ट नाही.
संजय राठोड यांनी जसा राजीनामा दिला तसा धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा : पंकजा मुंडे
कोरोनाची पार्श्वभूमी पाहता पिंपरी चिंचवड येथील मोरया गणपती मंदिर बंद राहणार. उद्या अंगारकी चतुर्थी असल्याने मंदिर समिती आणि प्रशासनाचा निर्णय. केवळ 20 भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडणार आहेत.
कोरनाचा संसर्ग वाढत असल्याने लग्न समारंभांना मोजक्या लोकांमध्ये परवानगी देण्यात येत आहे. मात्र, या परवानगीचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडी जमा होणाऱ्या अनेक मंगल कार्यालय वर कारवाई करण्यात आल्यानंतर आता थेट वधू-वराच्या वडिलांना दंड लावण्याची कारवाई परभणी केली जात आहे.

परभणी शहरातील एमआयडीसी परिसरातील फॅन पार्क याठिकाणी तिरुमल व डोंगरे परिवाराचा लग्न सोहळा पार पडला. या लग्नासाठी प्रशासनाकडुन केवळ पन्नास जणांना परवानगी देण्यात आली होती. मात्र, मोठ्या प्रमाणावर वऱ्हाडी या लग्नात सहभागी झाले, ही बाब परभणीच्या मनपा पथकाला कळाल्यानंतर परभणी महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या आदेशानुसार उपायुक्त जगताप,सहाय्यक आयुक्त महेश गायकवाड यांच्या नियंत्रणाखाली मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड स्वच्छता निरीक्षक अब्दुल शादाब, न्यायरत्न घुगे प्रशिक्षणार्थी स्वच्छता निरीक्षक विनायक बनसोडे यांच्या पथकाने लग्न सोहळ्याच्या ठिकाणी भेट दिली असता त्यांना या दोन्ही परिवाराने प्रशासनाने दिलेल्या परवानगीचा गैरवापर करून मोठया प्रमाणावर लोकांना जमा केले व कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा पालन केले नसल्याने वधू व वर या दोघांचे वडील भीमाशंकर आप्पा तिरुमल व चांदोजी डोंगरे यांना पंधरा हजारांचा दंड ठोठावला आहे.
सरकार टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालतात : पंकजा मुंडे
धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह. गेल्या दोन दिवसांपूर्वी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यासाठी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या उपस्थितीत निघाला होता रूट मार्च. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी न जाता काळजी घेण्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आवाहन.
मुंबई : किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले असून प्रताप सरनाईक प्रकरणी काही महत्वाचे पुरावे देण्यासाठी सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. या आठवड्यात शिवसेनेच्या आणखी एक मंत्र्याचा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे. हा मंत्री ठाकरे कुटुंबियांच्या जवळचा मंत्री असल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
अखेर आज सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा मुहूर्त टळला. खासदार विनायक राऊत यांनी 1 मार्चला चिपी विमानतळावरुन नियमित विमानसेवा सुरू होईल अशी माहिती दिली होती. मात्र हा मुहूर्त टळला आहे. विमानतळ सुरू होण्याबाबत सेनेच्या मंत्र्यांमध्ये तारखांबाबत विसंगती पहायला मिळत आहे. खासदार एक तारीख देतात तर स्थानिक सेनेचे आमदार दीपक केसरकर दुसरीच तारीख देत आहेत. मात्र अद्यापही DGCA ची अंतरिम परवानगी मिळालेलीच नाही. मुखमत्र्याना विमानतळ लवकर सुरू करण्याची घाई असल्याची टीका नारायण राणे यांनी केली आहे. आज विनायक राऊत यांच्या सोबत केंदीय संसदीय अंदाज समिती चे खासदार चिपी विमानतळाला भेट देऊन पाहणी करणार आहे.विरोधक मात्र राज्य सरकारच्या चुकीमुळे विलंब होत असल्याची टीका करत आहेत.
पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुण्यातील श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत उद्या (2 मार्चला) अंगारकी चतुर्थीला सारसबाग सिद्धिविनायक, मंदिर, दशभूजा गणपती मंदिर, आणि रमणा गणपती मंदिर लक्ष्मी नगर ही मंदिरे बंद राहणार आहे.
मुंबईतील अंधेरी दंडाधिकारी कोर्टाकडून कंगना रणौतविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. सुनावणीस गैरहजर राहिल्यानं कोर्टाची कारवाई. जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्याला कंगनाची अनुपस्थिती
पालघर नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली आहे. मोरेकुरण भागात असलेल्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली आहे. परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
यवतमाळ : महापारेषणच्या पुसद येथील 220 केवी सब स्टेशनला रात्री अचानक आग लागली होती. पुसद -कारला मार्गावरील या सबस्टेशनला रात्री आग लागली होती. अनेक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आग नेमकी कशाने लागली याची माहिती कळू शकली नाही
सोलापूर -

यशवंतपुर ते अहमदाबाद जाणाऱ्या बिकानेर एक्स्प्रेसवर दरोडा,

सोलापुरातील बोराटी ते नागणसुर दरम्यानची घटना,

पहाटे साडे तीन ते चारच्या सुमारास घटना घडली असल्याची माहिती,

रेल्वेतील प्रवाशांचे जवळपास 3 लाख रुपयांचे दागिने, मोबाईल आणि पैशांवर दरोडेखोरांनी डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती,

सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
पालघर नगरपरिषदेच्या डम्पिंग ग्राउंडला भीषण आग लागली आहे. मोरेकुरण भागात असलेल्या डम्पिंग ग्राउंडला आग लागली आहे. परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यात पुन्हा एकदा अज्ञात तरूणांनी वाहनाची तोडफोड केल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे, येरवडा फुले नगर येथील महात्मा फुले उद्यानाजवळ टोळक्याने दगडफेक करीत दोन तरुणांना जखमी केले. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत 7 ते 8 वाहनांचे नुकसान झाले आहे.
यवतमाळ : महापारेषणच्या पुसद येथील 220 केवी सब स्टेशनला रात्री अचानक आग लागली होती. पुसद -कारला मार्गावरील या सबस्टेशनला रात्री आग लागली होती. अनेक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली आग नेमकी कशाने लागली याची माहिती कळू शकली नाही
मलकापूर जिल्ह्यातील सिनेमा रोड येथे काही दुकानांना आग लागल्याने आजुबाजुच्या दुकानात ही आग पोहचल्याने मोठ अग्नितांडव बघयला मिळाला. मलकापूर येथील सिनेमा रोड वरील सुरुवातीला एका कापड दुकानात ही आग बघायला मिळाली. अचानक आग वाढतच गेल्याने आजुबाजूच्या सहा ते सात दुकानात ही आग पसरत गेली व ही दुकान आगीच्या विळख्यात आली. तंबाखू , कापड , पुस्तक आदी वस्तुंची दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ठ असून शॉर्टसर्किट मुळे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
पुण्यात पुन्हा एकदा अज्ञात तरूणांनी वाहनाची तोडफोड केल्यानं नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे, येरवडा फुले नगर येथील महात्मा फुले उद्यानाजवळ टोळक्याने दगडफेक करीत दोन तरुणांना जखमी केले. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेत 7 ते 8 वाहनांचे नुकसान झाले आहे.

हल्लेखोरांनी लोखंडी रॉड व दगडाच्या साह्याने वाहनांवर दगडफेक करीत दहशत माजवली. दोन तरुण या घटनेत जखमी झाले आहेत.जखमी तरुणांना उपचारासाठी येरवडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या घटनेची माहिती मिळताच पोलिस करतोय दाखल झाले. यामध्ये अजून देखील कुणालाही अटक करण्यात आलेली नाही आरोपींचा शोध सुरू आहे... या परिसरात राहणार्‍या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे..
बुलडाण्याच्या मलकापुर येथे मध्यरात्री अग्नीतांडव.

सहा दुकानांना आग. लाखोंचं नुकसान.

मलकापूर येथील सिनेमा रोडवरील घटना.
कोकणातील यंदाच्या शिमगोत्सवावर देखील कोरोनाचं सावट आहे. वर्ष झाल्यानंतर देखील कोरोनाची रूग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे सर्वच सण, उत्सव अत्यंत साधेपणानं साजरे केले जात आहेत. याच पार्श्वभूमिवर कोकणातील यंदाचा शिमगोत्सव देखील साधेपणानं साजरा केला जावा. सरकार आणि प्रशासनाच्या नियमांना प्रतिसाद द्यावा असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले आहे.

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळालं. भिवंडी तालुक्यातील राजणोली गावच्या हद्दीत असलेल्या उमिया स्वामील नावाच्या लाकडी वखारीत अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या आगीत संपूर्ण लाकडाची वखार जळून खाक झाली आहे. आगीचे नेमकं कारण समजू शकलेलं नसलं तरी आग इतकी मोठी होती की आगीत सर्व लाकडं, मशीन, सागाची लाकडे जळून खाक झाली आहेत.

पार्श्वभूमी

राज्यात कोरोना बाधित रुग्णसंख्येचा आलेख चढताच! निर्बंध वाढवण्याची शक्यता


 


राज्यात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढतच आहे. आज (28 फेब्रुवारी) पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ पाहायला मिळाली. मागील 24 तासाच महाराष्ट्रात 8 हजार 293 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोबतच आज कोरोनामुळे 62 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 3753 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. राज्यात एकूण 20 लाख 24 हजार 704 रुग्ण बरे घरी परतले आहेत. सध्या राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 77 हजार 008 आहे. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.70 टक्के झालं आहे.


 


पूजा चव्हाण प्रकरण : आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाई, शांताबाई चव्हाण यांना पोलिसांची नोटीस


 


माजी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी वानवडी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण यांना वानवडी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. तृप्ती देसाई आणि शांताबाई चव्हाण पोलिसांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांनी ही नोटीस बजावली आहे.


 


'कोविड-19' लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सुसज्ज


 


केंद्र शासनाच्या आदेशानुसार 'कोविड-19' लसीकरणाचा तिसरा टप्पा सोमवारी 1 मार्च 2021 पासून सुरू होत आहे. या टप्प्यात वयाची 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच वयाची 45 वर्षे पूर्ण ते 60 वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (comorbidity) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण या तिसऱ्या टप्प्यामध्ये केले जाणार आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे देण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरणाचा तिसरा टप्पा महापालिकेच्या व शासकीय रुग्णालयांसह खासगी इस्पितळांमध्येही राबविण्यात येणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.