एक्स्प्लोर

काँग्रेसच्या चाणक्याला हरवण्यासाठी भाजपचा सापळा

बिहारमध्ये लालू-नितीश यांच्या युतीला सुरुंग लावल्यानंतर, भाजपच्या चाणक्यांची नजर आता गुजरातकडे वळली आहे.

नवी दिल्ली: बिहारमध्ये लालू-नितीश यांच्या युतीला सुरुंग लावल्यानंतर, भाजपच्या चाणक्यांची नजर आता गुजरातकडे वळली आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर असलेलं सावजही तितकंच मोठं आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे सर्वात विश्वासू आणि राजकीय सल्लागार अहमद पटेल यांना राज्यसभेच्या निवडणुकीत रोखण्यासाठी भाजपनं एकापाठोपाठ एक चाली खेळायला सुरु केल्या आहेत. शंकरसिंह वाघेला या काँग्रेसच्या बड्या नेत्यानं नुकतीच पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या बंडाळीचा फायदा घेत अहमद पटेल यांची राज्यसभेतली वाट बिकट करण्याचा भाजपचा डाव आहे. गुजारातच्या 182 आमदारांच्या विधानसभेत भाजपकडे 121 आमदार असल्यानं अमित शाह, स्मृती इराणी हे भाजपचे राज्यसभेचे दोन्हीही उमेदवार आरामात जिंकू शकतात. जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची 47 मतं आवश्यक आहेत. गुजरातमध्ये काल काँग्रेसच्या तीन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर शुक्रवारी आणखी दोगा आमदारांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या घटून 57 वरुन 52 वर घसरली आहे. शिवाय राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेसच्या 11 आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यानं काँग्रेसची धास्ती वाढली आहे. बलवतसिंह राजपूत, तेजश्री पटेल आणि पीआय पटेल या काँग्रेसच्या तीन आमदारांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. चन्नाभाई चौधरी आणि मान सिंह चौहान यांनी आज काँग्रेस सोडलं. विशेष म्हणजे यातल्याच फुटीर बलवंतसिंह राजपूत यांना भाजपनं राज्यसभेसाठी आपला तिसरा उमेदवार म्हणून जाहीरही करुन टाकलं. बलवंतसिंह हे गुजरात विधानसभेत काँग्रेसचे व्हिप होते, शिवाय ते शंकरसिंह वाघेला यांचे नातेवाईकही आहेत. वाघेलांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली असली तरी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत असलेले आमदार गळाला लावण्यात यश आलं, तर अहमद पटेल यांची राज्यसभेतली वाट बिकट होऊ शकते. अहमद पटेल हे गुजरातमधले एकमेव मुस्लिम खासदार आहेत. राज्यसभेतलं संख्याबळ वाढवून मोदींचे हात आणखी मजबूत करण्यासाठी भाजप एकेक खासदार कसा वाढवता येईल, यासाठी कसोशीनं प्रयत्न करतंय. अहमद पटेल यांचा चुकून पराभव झालाच, तर तो केवळ एक निकाल नसेल. तर काँग्रेससाठी प्रचंड धक्का असेल. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसचं नैतिक मनोधैर्य खच्ची करण्यात भाजपला यश येईल. सक्रीय राजकारणात नसले तरी अहमद पटेल हे यूपीएच्या काळात काँग्रेसमध्ये नंबर 2 चं व्यक्तिमत्व मानलं जायचं. सोनियांच्या राजकीय निर्णयांमध्ये पटेल यांचा सल्ला मोलाचा असायचा. लो प्रोफाईल राहणी पसंत करणारे अहमद पटेल हे पाचव्यांदा राज्यसभेची निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या या चाणक्याचा पराभव करण्यात भाजपला यश येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यसभेसाठी गुजरातमध्ये 8 ऑगस्टला मतदान होणार आहे. नितीशकुमार यांच्यासारखा मातब्बर सहकारी यूपीएतून फोडण्यात यश आल्यानंतर, आता अहमद पटेल यांना राज्यसभेत हरवण्यासाठी भाजपनं सापळा लावलाय. राजकारणात किलिंग इन्स्टिक्ट  शत्रूला नामोहरम करण्याची अमित शहांची ही शैली यावेळीही परिणामकारक ठरणार का याची उत्सुकता आहे. गुजरात आणि राज्यसभेचं गणित
  • 182 सदस्यसंख्येच्या गुजरात विधानसभेत भाजपचे 121 आमदार
  • काँग्रेस आमदारांची संख्या 57
  • मात्र शंकरसिंह वाघेलांसह 5 आमदारांनी सोडचिट्ठी दिल्याने काँग्रेसचं संख्याबळ 52 वर
  • राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 47 मतं आवश्यक
  • मात्र काँग्रेसच्या 52 पैकी वाघेला गटाचे अनेक आमदार आहेत
  • त्यामुळे अहमद पटेल यांना 47 मतांसाठी मोठा संघर्ष करावा लागणार
  • राष्ट्रपती निवडणुकीत 11 मतं फुटल्याने काँग्रेसला धास्ती
  • राज्यसभेसाठी गुजरातमध्ये 8 ऑगस्टला मतदान

महत्त्वाच्या बातम्या

Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
Sanjay Raut on Delhi Protest: दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ
दिल्लीतील त्या कारमध्ये सापडले पोलिसांचे गणवेश, खाकी वर्दीतील गुंडांकडून आंदोलकांना मारहाण? संजय राऊतांनी शेअर केला धक्कादायक व्हिडीओ

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Rahul Gandhi on PM Modi: 'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
'मोदीजी आपल्या सरकारमधील 200 अधिकारी आमच्या संपर्कात; ED, CBI ची आतली माहिती आम्हाला देत आहेत, त्यामुळे तुम्ही..' राहुल गांधींचा सनसनाटी गौप्यस्फोट
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
भीमनवारांची चौकशी तुकाराम मुंढे करू शकत नाहीत; गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया, पुण्यातील आंदोलनावर टीका
Embed widget