एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
JP Nadda Father Hospitalized: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वडिलांची प्रकृती बिघडली, खाजगी रुग्णालयात दाखल
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे वडील नारायण लाल नड्डा यांना प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नारायणलाल नड्डा यांना श्वास घेण्यात त्रास होत होता.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे वडील नारायणलाल नड्डा यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारासाठी चांदपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे बोलले जात आहे. नारायण लाल नड्डा हे बिलासपूर जिल्ह्यातील विजयपूर निवासस्थानी राहतात.
श्वास घेण्यास त्रास शनिवारी सकाळी जेपी नड्डा यांचे वडील नारायणलाल नड्डा यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर त्यांना चांदपूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, असे सांगितले जात आहे. त्यांच्या चाचण्यांचे अहवाल सामान्य असल्याचे सांगितले जाते. सध्या त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक
भारत
Advertisement