प्रयागराज : भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी यांच्या सहा वर्षींच्या नातीचा फटाक्यांमुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी फटाके फोडताना कपड्यांना आग लागली आणि त्यामध्ये रिटा यांच्या नातीचा मृत्यू झाला आहे. रिया यांचा मुलगा मयंक जोशी यांची ही एकुलती एक सहा वर्षांची मुलगी फटाके फोडत होती. आणि इतर घरातल्या मुलांसोबत घरातील गच्चीवर खेळत होती. दिवाळीचे फटाके फोडताना तिच्या कपड्यांनी पेट घेतला. त्यात ती गंभीर रित्या भाजली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु, उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.


घराच्या गच्चीवर फटाके फोडताना फटाक्यांची ठिणगी रिटा यांच्या कपड्यांवर उडाली आणि कपड्यांनी पेट घेतला. दिवाळीनिमित्त तिने फॅन्सी ड्रेस घातला होता. या दुर्घटनेत ती जवळपास 60 टक्के भाजली होती. तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तसेच तिला एअर अॅम्बुलन्समधून दिल्लीला शिफ्ट केलं जाणार होतं. परंतु, शिफ्टिंग करण्यापूर्वीच मुलीचा मृत्यू झाला.


उपचारासाठी रिटा यांच्या नातीला दिल्लीला हलवण्यापूर्वी प्रयागराज येथील खासगी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री मौर्या यांनी सांगितलं की, उपचारासाठी दिल्लीला दाखल करण्याची तयारी सुरु होती. पण त्याआधीच चिमुकलीचा मृत्यू झाला.


उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्या यांनी या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केलं आहे. तसेच मौर्या यांनी लहान मुलांना विस्फोटक आणि ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवण्याचं आवाहन केलं होतं.


पाहा व्हिडीओ : भाजप खासदार रीटा बहुगुणांच्या नातीचा मृत्यू; फटाके फोडताना कपड्याने पेट घेतल्याने चिमुकलीचा मृत्यू



काही दिवसांपूर्वी केली होती कोरोनावर मात


मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिटा बहुगुणा जोशी यांच्या नातीला काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर यशस्वी मात करून ती कोरोनामुक्तही झाली होती. गुडगाव येथील रुग्णालयात आजी रिटा आणि कुटुंबातील इतर सदस्यांवर उपचार करण्यात आले होते. दरम्यान, अलाहाबाद येथील भाजप खासदार रीटा जोशी यांनी योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं आहे.


महत्त्वाच्या बातम्या :