नवी दिल्ली : दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे. जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रात्री उशिरा ही कारवाई केली. अटक करण्यात आलेले दोन दहशतवाद्यांपैकी एक जम्मू-काश्मीरच्या बारामुला आणि एक कुपवाडा येथील राहणारे होते. असं सांगण्यात येत आहे की, दोघांनी दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट रचला होता. तसेच या दोघांकडून दोघांकडून स्फोटक आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.
असं सांगण्यात येत आहे की, दिल्ली पोलिसांना या दोघांसंदर्भात माहिती मिळाली होती. त्यानंतर या दोन दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ट्रॅप लावण्यात आला होता. सोमवारी रात्री 10.15 वाजता जैश-ए-मोहम्मदच्या दोन्ही दहशतवाद्यांना सरायकाले खां येथील मिलिनियम पार्कजवळ अटक करण्यात आली. तसेच या दोन दहशतवाद्यांकडून काही हत्यारंही ताब्यात घेण्यात आली आहेत.
चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही दहशतवादी दिल्ली-एनसीआरमधील काही ठिकाणी स्फोट घडवून आणण्याचा कट रचत होते. यांच्या निशाण्यावर अनेक व्हिआयपी देखील होते. पोलिसांनी यांच्याकडून दोन सेमी ऑटोमॅटिक पिस्तोल आणि 10 जीवंत काडतूसं जप्त केली आहेत. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता.
असं सांगण्यात येत आहे की, हे दोघेही सोशल मीडियामार्फत एका दहशतवाद्यांच्या संघटनेच्या संपर्कात आले होते. हे दोघेही पाकिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात होते. तसेच अनेकदा बॉर्डर पार करण्यात अयशस्वीही ठरले होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी या दोघांबाबत माहिती मिळाली होती. दोघेही 20 ते 22 वर्षांचे असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांचं म्हणणं आहे की, सध्या या दोघांची चौकशी सुरु असून याप्रकरणी आणखी काही जणांना अटक होऊ शकते.