नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरातील लोकांमध्ये संताप आहे. आरोपींना फाशी देण्याची मागणी होत असताना या संपूर्ण प्रकरणात पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एबीपी न्यूज सातत्याने हा मुद्दा उपस्थित करत आहे. मीडियाला कोणत्या कायद्यानुसार पीडितेच्या कुटुंबाला भेटू दिलं जात नाहीय. मात्र आता भाजप नेत्या उमा भारती यांनीही हाच प्रश्न उपस्थित करत उत्तर प्रदेशातील योगी सरकारल घेरलं आहे.


उमा भारती म्हणाल्या की, 'ती दलित कुटुंबातील मुलगी होती. घाईघाईने पोलिसांनी तिचे अंत्यसंस्कार केले आणि आता कुटुंबियांना आणि गावाला पोलिसांनी वेढा घातला आहे. माझ्या माहितीनुसार, एसआयटी तपासात कुटुंबातील सदस्यांनी कुणालाही भेटू नये असा कोणताही नियम नाही. त्यामुळे संपूर्ण एसआयटी चौकशीच संशयाच्या भोवऱ्यात येईल.





उमा भारती पुढे म्हणाल्या, आम्ही नुकतीच राम मंदिराची पायाभरणी केली आहे आणि रामराज्य देशात आणण्याचा दावा केला आहे. परंतु या घटनेबाबत पोलिसांच्या संशयास्पद कारवाईने उत्तर प्रदेश सरकार आणि भाजपाच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उद्देशून पुढे त्या म्हणाल्या की, तुम्ही स्वच्छ प्रतिमेचे राज्यकर्ता आहात. मी आपणास विनंती करते की मीडियातील व्यक्ती आणि इतर राजकीय पक्षांना पीडित कुटुंबाची भेट घेण्याची परवानगी द्यावी.


संबंधित बातम्या




#ABPKoMatRoko | ABP Newsचा हाथरसमध्ये सत्याग्रह, एबीपीच्या प्रतिनिधींसोबत पोलिसांचं गैरवर्तन